मुंबई येथील पी अँड जी ग्लोबल प्रॉडक्शन तर्फे गोव्यात येत्या जानेवारी महिन्यात पेजन्ट अर्थात मॉडेलिंग स्पर्धा

.
मुंबई येथील पी अँड जी ग्लोबल प्रॉडक्शन तर्फे गोव्यात येत्या जानेवारी महिन्यात पेजन्ट अर्थात मॉडेलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे प्रसिद्ध मॉडेल, फॅशन डिझायनर, इव्हेंट ऑर्गनायझर तथा पी अँड जी ग्लोबल चे गौरव सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
      कांदोळी येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आफ्रिकन मॉडेल डेनियल, कुटुंभ इव्हेंट्स चे निलेश हडफडकर, व नीलम देशमुख उपस्थित होते.
       मि., मिस व मिसेस युनायटेड इंडिया सबकॉन्टी्नेंटल या नावाने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेकरिता गोव्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही स्पर्धा इंडियन आर्मी ला समर्पित करण्यात येणार असून या स्पर्धेद्वारे मिळणारा फायदा बिगर शासकीय संस्थाना देण्यात येणार आहे. गोव्यात पहिल्यादांच असा उपक्रम राबवण्यात येत असून या स्पर्धेत भारतीय संसंकृती व वस्त्रप्रावणाना प्राधान्य दिले जाणार आहे असे गौरव सिंग यांनी सांगितले.
       फोटो……. पी अँड जी ग्लोबल प्रॉडक्शन तर्फे गोव्यात घेण्यात येणाऱ्या मॉडेलिंग स्पर्धेविषयी माहिती देताना गौरव सिंग, सोबत डेनियल, निलेश हडफडकर व नीलम देशमुख……. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar