बार्देशच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही, ग्रामसभा घेण्याचे टाळल्याने ग्रामस्थांकडून नाराजी..

.
बार्देशच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही हणजूण कायसूव पंचायतीने हणजूण कायसूव पंचायतीने ग्रामसभा घेण्याचे टाळल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.                  बार्देश च्या गटविकास अधिकाऱ्यांनी बार्देश तालुक्यातील सर्व पंचायतींना ग्रामसभा घेण्याकरिता दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी एक आदेश काढला होता, यात सर्व पंचायतीनी नोव्हेंबर महिन्यात पंचायतीच्या ग्रामसभा कोविडचे सर्व नियम पाळून ग्रामसभा घेण्यास संगितले होते, त्यात हणजूण कायसूव पंचायतीला दि.21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ग्रामसभा घ्यावी असे कळवण्यात आले होते, सोशल मीडियावरून हा आदेश बहुतेक सर्व ग्रामस्थांना कळला होता, पण हणजूण कायसूव पंचायतीने ग्रामसभेची नोटीस न काढल्याने ग्रामस्थांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. ग्रामसभा घेण्यासाठी सात दिवस अगोदर नोटीस काढावी लागते आणी जनतेचे लेखी ठराव किंवा प्रश्न घेण्याकरिता तीन दिवसांच्या अवधी द्यावा लागतो.
          असे काही न करण्यात आल्याने दि.21 रोजी ग्रामसभा होईल की नाही, आणी न कळवता घेतली तर असा समज करून सरपंचांवर विश्वास नसल्याने सुमारे पाच ते सात ग्रामस्थानी पंचायत कचेरीत लेखी ठराव व प्रश्न सादर केले होते, पंचायत कार्यालयात ते स्वीकृत केल्याने आज दि.21 रोजी सकाळी 10 वा 35 ते 40 ग्रामस्स्थ पंचायत कार्यालयाबाहेर जमा झाले पण ग्रामसभा नसल्याचे कळल्यावर सरपंचाच्या नावाने शिगमा करून निघून गेले.
           सरपंच सावियो अल्मेदा जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्यास घाबरत असल्याने ग्रामसभा घेण्याचे टाळत असल्याचे ग्रामस्थ थॉमस फर्नाडिस यांनी सांगितले. जो गावचा विकास करू शकला नाही तो मतदार संघाचा काय विकास साधणार असे थॉमस यांनी सांगितले. सरपंच सध्या निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे, पुढील महिन्यात आचार संहिता लागू केल्यास ग्रामसभा घेता येणार नाही, ग्रामसभा घेतल्यास जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल म्हणून सरपंचानी आजची ग्रामसभा घेण्याचे मुद्दाम टाळले असा आरोप रवी हरमलकर या ग्रामस्थाने केला.
          दरम्यान ग्रामसभा नंतर घेण्यात येणार असल्याचे सरपंच सावियो अल्मेदा यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar