म्हापसा मतदार संघातून मलाच उमेदवारी मिळेल असा मला ठाम विश्वास आहे:जोशुआ डिसोझा

.
म्हापसा मतदार संघातून मलाच उमेदवारी मिळेल असा मला ठाम विश्वास आहे, माझ्या आमदारकीच्या काळात झालेली विकासकामे, म्हापसा भाजपा मंडळाचा पाठींबा व आपण अल्पसंख्याक समितीचा राष्ट्रीय सचिव आहे व लोकांचा मला भरपूर पाठींबा आहे, गेली विस वर्षे म्हापसा भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे म्हणून उमेदवारी बद्दल कोणतेही दुमत नाही असे म्हापसाचे आमदार तथा गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
         उत्तर गोवा जिल्हा भाजपा कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक सुशांत हरमलकर, नगरसेवक स्वप्नील शिरोडकर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
        आमदार म्हणून म्हापसा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यास आपणास फक्त दोन वर्षे मिळाली,  या कार्यकाळात आपण म्हापसा मतदार संघातील सुमारे 140 करोड खर्च करून विकास कामे पूर्ण केली. या काळात आठ महिने कोवीडात गेले, नंतर पावसाळा यामुळे बऱ्याच विकासकामांना अडथळा आला.अनेक विकास कामे मार्गी आहेत त्यातील महत्वाचे म्हणजे 116 करोड खर्चून करण्यात येणारे भूमिगत विजवाहिन्यांचे काम व 17.5 करोड खर्चून रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत, आंतरराष्ट्रीय बस स्थानकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून येत्या 19 डिसें. रोजी त्याचे उदघाट्न करण्यात येणार आहे. म्हापसाची विकासकामे करण्यास आपणास फक्त दोनच वर्षे मिळाली, पुन्हा एकदा संधी मिळाल्यास सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न असेल असे आमदार जोशुआ यांनी सांगितले.
           मंत्री मायकल लोबो यांची आपल्या मतदार संघात लुडबुड वाढली आहे, मंत्री म्हणून ते आपला दरारा दाखवत आहेत, आपण त्या बद्दल पक्षश्रेष्टी कडे अगोदरच तक्रार केली आहे पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असेच चालू राहिल्यास ते पक्षास मारक ठरेल असे जोशुआ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
    फोटो……. म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जोशुआ डिसोझा, सोबत नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर व इतर……. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar