वागातोर समुद्र किनाऱ्यावर सोडण्यात आलेले दुर्गंधीयुक्त सांडपाणी…

.
वागातोर समुद्र किनाऱ्यावर शापोरा किल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या हॉटेल आस्थापनातून सेप्टीक टॅंक मधील सांडपाणी सोडण्यात येत असल्याने किनाऱ्यावर दुर्गधी पसरलेली असते, दर सहा महिन्यांनी असा प्रकार होत असल्याचे स्थानिक सांगतात.
          उत्तर गोव्यातील वागातोर किनारा हा सर्वात सुदंर असा समुद्र किनारा, जगप्रसिद्ध अश्या या किनाऱ्यावर देशी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.या किनाऱ्यालगत शापोरा किल्याच्या पायथ्याशी एक मोठा हॉटेल प्रकल्प असून पावसाळ्यात किल्याच्या डोंगर माथ्यावरून वाहणारे पाणी या हॉटेल प्रकल्पच्या जागेतून समुद्रात येते, डोंगरावरून वाहणारे काही झरे याच मार्गाने समुद्राला मिळतात,  याचाच फायदा उठवत हॉटेल व्यवस्थापन हॉटेल चे सांडपाणी या पाण्यात सोडतात जे वाहत्या पाण्याबरोबर बाहेर समुद्रात येते, पावसाळ्यात हा प्रकार सर्रास होतो. या बाहेर सोडलेल्या पाण्याची दुर्गधी सर्वदूर पसरते.
         या दुर्गधीचा त्रास सर्वात जास्त पहाटेच्या वेळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या स्थानिकांना व पर्यटकांना होतो, शुद्ध हवेत चालण्यासाठी हे लोक येतात पण त्यांना दुर्गंधी सहन करावी लागते. काही वर्षांपासून हा प्रकार होत आहे, या प्रकाराबाबत स्थानिकांनी तक्रारही केली होती पण काही कारवाई झाली नाही, वर्षातून साधारण दोन वेळा हा प्रकार होत असतो असे पहाटेच्या वेळी व्ययामासाठी येणारे होनाजी सावंत या ग्रामस्थाने सांगितले. लोक आरोग्य चांगले रहावे म्हणून पहाटे समुद्र किनाऱ्यावर चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येतात पण सांडपाण्याच्या या दुर्गधी मुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी शिवोली आरोग्य केंद्राने व हणजूण कायसूव पंचायतीने या प्रकारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ रिमा नाईक या महिलेने केली आहे.
     फोटो………. वागातोर समुद्र किनाऱ्यावर सोडण्यात आलेले दुर्गंधीयुक्त सांडपाणी….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar