कोलवाळ येथील पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर.

.
गोव्यातील मुलांमधून चांगले चित्रकार शोधण्याचे काम पॉवरग्रीड महामंडळ अनेक वर्षांपासून करीत आहे, चित्रकलेच्या बाबतीत गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर यावे याकरिता पुढील वर्षांपासून येथील मुलांकरिता चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन पॉवरग्रीड महामंडळ पश्चिम क्षेत्र एक चे कार्यकारी अधिकारी एस. रवींदर कुमार यांनी केले.
      कोलवाळ येथील पॉवरग्रीड महामंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते हजर होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर त्यांच्या सोबत गोवा कला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रचार्य महेश वेंगुर्लेकर, तांत्रिक क्षिक्षण, गोवा चे सहाय्य्क संचालक विवेक बेलोकर, पॉवरग्रीड प. क्षेत्र एक चे महाप्रबंधक आर. नारायण, नोडल अधिकारी अनिलबाबू जी. नाईक उवस्थित होते.
      भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय संपूर्ण भारतातील ऊर्जा संरक्षणासाठी वर्षभर जागृती अभियान चालवते. या अभियानाअंतर्गत राज्य पातळीवर व राष्ट्रीय स्थरावर ऊर्जा क्षमता या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करते. यावर्षीही दोन गटात स्पर्धा घेण्यात आली होती.
       यावेळी बोलताना विवेक बेलोकर यांनी सांगितले की मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या, त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करा. तर महेश वेगुर्लेकर यांनी सांगितले की अश्या स्पर्धामधून सहभागी होण्याकरिता मुलांना शाळांनी प्रोत्साहन द्यावे, आणी पालकांनी त्यांना चांगले चित्रकलेचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेंत पॉवरग्रीड ने पुढील वर्षांपासून कार्यशाळा घ्याव्यात तसेच ज्या चित्रकला शिक्षकांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त विध्यार्थी स्पर्धेत विजेते होतील त्या शिक्षकांचाही सन्मान करावा अशी सूचना वेंगुर्लेकर यांनी केली.
        या स्पर्धेतील अ गटातील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे 1) सराह परेरा ( मीराकल्स हायस्कुल, सांगे ), 2 ) ख़ुशी देविदास पेडणेकर ( सर्वोदया एज्युकेशन, सावर्डे ), 3) वेरिअन वालदरीस ( बेथोनी हायस्कुल ), ब गटातील विजेते प्रथम…कनिक्षा रामदास फळदेसाई ( जवाहर नवोदया विद्यालय, काणकोण ),दुसरे…आर्यन दिपक वेंगुर्लेकर ( जी. एस. आमोणकर विद्यालय, म्हापसा ), तिसरे…कुणाल बार ( मदर मेरी हायस्कुल, मेरशी )
   फोटो……. कोलवाळ येथील पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर…..( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar