येथील वस्तवाडा श्री राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानचा 6 वा वर्धापनदिन सोहळा सोमवार 13 डिसेंबर रोजी

.

हरमल प्रतिनिधी

येथील वस्तवाडा श्री राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानचा 6 वा वर्धापनदिन सोहळा सोमवार 13 डिसेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.

ह्यानिमित सकाळी धार्मिक विधी,गणपती पूजन,पुण्याहवाचन, शुद्धी होम,लघुरुद्र, दुपारी 12.30 वाजता आरती,तिर्थप्रासाद,महाप्रसाद व रात्री 8.30 वाजता
चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळाचे ‘वज्रशल्क’ नाटक सादर होईल.मंगळवार 14 रोजी सकाळी धार्मिक विधी व संध्याकाळी 4 वाजता वर्षपद्धतीप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे.तरी भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे व तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राष्ट्रोळी देवस्थान समितीतर्फे अध्यक्ष सुभाष वस्त,खजिनदार अनिल वस्त व सचिव साईश वस्त यांनी केले आहे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar