कोरगांव:स.प्रा.वि भटवाडी कोरगांव शाळेमध्ये ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. सी. अध्यक्षा सौ.प्रांजन्न गणपुले उपस्थिति होत्या.त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणास शाळेचे माजी अध्यक्ष श्री परशुराम गणपुले,एस.एम.सी व पी.टी.ए सभासद, पालक शिक्षक वर्ग उपस्थिति होता.ध्वजाला मानवंदना व घोषणा देऊन ध्वजाचा अभिमान जाग्रुत केला. राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. या दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात सानवी सागर नानोस्कर इयत्ता तिसरी) हीने प्रथम क्रमांक तर रेवा रघुनाथ गावडे ( इयत्ता ४ थी) हिला दुसरा क्रमांक मिळाला. यावेळी आनलाईन कागदकाम स्पर्धा घेण्यात आली . कागदापासून तीचे फुले तयार करणे व ती फुले शाळेत आणून देणे असे तीचे स्वरूप होते.
माजी विद्यार्थीनी मर्धया नागवेकर व मनस्वी नागवेकर यांनी प्रजासत्ताक दिन या विषयावर सुंदर रांगोळी काढली होती. सुत्रसंचालन सिद्धी कामुलकर तर शर्वरी नाईक यांनी आभार मानले.
स.प्रा.वि भटवाडी कोरगांव शाळेमध्ये ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
.
[ays_slider id=1]