जॉन मेलचियर बॉस्को 16 ऑगस्ट 1815 रोजी जन्मले आणि 31 जानेवारी 1888 रोजी अंतर्धान पावले

.

 

जॉन मेलचियर बॉस्को 16 ऑगस्ट 1815 रोजी जन्मले आणि 31 जानेवारी 1888 रोजी अंतर्धान पावले. डॉन बॉस्को म्हणून ते प्रसिद्ध झाले. ते 19 व्या शतकातील इटालियन रोमन कॅथोलिक धर्मगुरू, शिक्षक आणि लेखक होते.

जेव्हा ते दोन वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे वडील वारले. त्यांना आईने वाढवलेले. अतिशय कोवळ्या वयात गरिबीच्या वेदना त्यांनी अनुभवल्या. नंतर वयाच्या नवव्या वर्षी पडलेल्या स्वप्नाची प्रेरणा त्यांना मिळाली. तरुणांना मदत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक, प्रचारक बनायचे होते. आपल्या ध्येयवादी स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी जॉनला शहरातील शाळेत जाण्यासाठी तरुण वयातच घर सोडावे लागले. शाळेनंतर रात्री उशिरा मेणबत्ती लावून अभ्यास करायचे. पैसे कमवण्यासाठी शिंपी, मोची किंवा वेटर म्हणून ते काम करत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी धर्मगुरू होण्यासाठी अभ्यास सुरू केला.

जेव्हा लोकांना औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचे अनेक दुष्परिणाम सहन करावे लागले तेव्हा त्यांनी समाजासाठी जीवन समर्पित केले. त्यांचे जीवन रस्त्यावरील मुले, अल्पवयीन गुन्हेगार आणि इतर गैरसोय यांच्या सुधारणेसाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी सहज सोपी अशी आणि सर्वांना आवडेल अशी प्रेमावर आधारित शिक्षण पद्धती विकसित केली. नंतर पुढे तीच एक आदर्श पद्धत बनली.
या आदर्श पद्धतीला सेल्सियन प्रणाली म्हणून ओळखले जाते.

डॉन बॉस्कोची यंत्रणा

डॉन बॉस्को शिक्षणाच्या अद्वितीय प्रणालीचे प्रसारण करते. शिक्षणाद्वारे कोणत्याही शारीरिक किंवा नैतिक हानीपासून संरक्षण आणि तरुणांना वाईट प्रभावापासून प्रतिबंधित करते.
डॉन बॉस्कोचा मार्ग आनंदाचा मार्ग आहे, जो जीवनाचे ध्येय आणि शिक्षणाचे ध्येय आहे. प्रत्येक घटकातील वंचित तरुणांसाठी त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी, डॉन बॉस्को यांनी कार्य केले. 1888 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सदस्यांनी ‘सेलेसिसन्स ऑफ डॉन बॉस्को’ (SDB) ही पदवी स्वीकारली. आज 130 राष्ट्रांमध्ये अंदाजे 16,000 सदस्य आहेत. ते त्यांचा वेळ आणि संसाधने याद्वारे शिक्षण आणि मार्गदर्शन करतात.
विशेषतः गरीब आणि वंचित असलेल्या तरुणांची सेवा हा त्यांचा अग्रक्रम.125 देशांमधील 3,000 शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शाळा आणि युवा केंद्रांद्वारे, डॉन बॉस्कोचे सेल्सिझन्स धार्मिक भेद किंवा सामाजिक असमानता लक्षात न घेता सर्व तरुणांना सेवा देतात.
आज देशभरातील सर्व संस्थांसाठी एक असा दिवस की ज्यातून या संस्थापकाच्या कार्याला उजाळा मिळतो. सेंट डॉन बॉस्को. 31 जानेवारी 1888 रोजी अंतर्धान पावले. त्यांच्या कार्याचा वसा डॉन बॉस्को संस्थांच्या माध्यमातून पुढे जात आहे. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक हे कार्य अविरतपणे पुढे नेत आहेत.
या संस्थेचे शिक्षक म्हणून, शिक्षण आणि जागृती आम्ही करीत आहोत. आपण आदर्श पालकांप्रमाणे वागू या आणि नेहमी सौम्य आणि विवेकी राहू या. आमचे प्राचार्य रेव्ह. फादर जोनाथन रिबेरो, sdb यांनी हे विचार सतत पुढे नेले आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि आम्हाला या आदर्श विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रेरित करत आहेत.
आपण सेंट जॉन बॉस्को यांची आठवण म्हणून आजचा दिवस साजरा करत असताना या महान माणसाच्या पावलावर पाऊल ठेवूया.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar