कळंगुट पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत ओर्डा – कांदोळी येथे एका घरावर धाड टाकून 4.32 लाख रोख रकमेसह 12 लाख 12800 किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला, या प्रकरणी घाना ची नागरिक असलेल्या महिलेस अटक करण्यात आली. दि.31 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.
कळंगुट पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिलेल्या माहिती नुसार ओर्डा-कांदोळी येथील एका भाड्याच्या घरात भाडोत्री म्हणून राहाणाऱ्या प्रसिल्ला अडजेते या विदेशी महिलेचा अमली पदार्थ प्रकरणात सहभाग असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार कळंगुट पोलिस स्थांकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर तसेच त्यांच्या सहकारी पथकाने सापळा रचून घरांवर धाड घातली असता त्या घरात हेरॉईन 33 ग्राम, कोकेन 35 ग्राम, चरस 35 ग्राम तसेच एक्टासी 8 ग्राम याप्रमाणे विविध प्रकारचा अंमली पदार्थ मिळून अंदाजे 12 लाख 12 हजार 800 रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. दरम्यान, कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या सोबत उप-निरीक्षक राजाराम बागकर, हेड-कॉन्स्टेबल विद्या आमोणकर, कॉ. भगवान पालयेंकर, गणपत तिळोजी, फ्रांन्सिस फर्नाडीस, आमीर गरड, आकाश नाईक, महेंद्र च्यारी तसेच चालक सुनील म्हाळशेंकर यांनी ही कारवाई केली.
संशयित महिला प्रिसीला यांच्या विरोधात कळंगुट पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हां दाखल करण्यात आला असून उप-अधिक्षक विश्वेष कर्पे तसेच उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.