म्हापसाचे दोन्ही उमेदवार भाजपाचेच

.

 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यासह म्हापसातही प्रचार जोरात सुरू आहे. सर्व पक्षांनी आपली पूर्ण ताकद प्राचारात झोकली असून यंदा तृणमूल कॉंग्रेस – मगो युती, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तृणमूल – मगो युतीचे उमेदवार ऍड.तारक आरोलकर यांनी प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही.
दरम्यान सोशल मीडियावर चर्चा आहे, की म्हापसात भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार हे दोघेही भाजपचेच आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे अगोदर भाजपमध्ये होते. 2019 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी पक्षाच्या तिकिटासाठी दावा केला होता.परंतु, तेव्हा तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि पोटनिवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा 2022 विधानसभा निवडणुकीत कांदोळकर यांनी भाजप तिकीट मिळण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर देखील कांदोळकर भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात काही काळापूर्वी सुरू होती.
विद्यमान आमदार तथा भाजपचे उमेदवार ज्योशुआ डिसोझा यांनी गेल्या अडीच वर्षात काहीच केलेले नाही. नवीन बस स्थानकाचे घाईगडबडित उद्घाटन केले आहे.परंतु, त्यानंतर लगेच तो बंद करण्यात आला आहे, कारण काम पूर्ण झालेले नाही. मतदारसंघाचे मूलभूत समस्या सोडवण्यात ज्योसुआ यांना अपयश आले असून एकावेळी त्यांना तिकीट नाकारली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. एक निष्क्रिय आमदार म्हणून ज्योसुआ यांची ओळख राज्यात झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत. त्यातील सर्वेश गडेकर नामक व्यक्तीचा ऑडिओ क्लिप व्हाट्सअप्पवर फॉरवर्ड केला जात. सर्वेश गडेकर त्यात म्हणतात की, कॉंग्रेसला मतदान करणे म्हणजे, भाजपला मत दिल्यासाऱखे आहे. कारण कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे भाजपमधूनच आले आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार्‍यापैकी सुधीर कांदोळकर देखील होते. विजयी झाल्यास ते कॉंग्रेससोडून भाजपमध्ये जाणार हे नक्की असल्याचा दावा गडेकर यांनी केला आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar