म्हापसा :हणजूण पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत हैद्राबादच्या युवकास अटक करून 3,65000/- च्या अंमली पदार्थासह 15 लाखाचा ऐवज जप्त केला.ही कारवाई दि.5 रोजी पहाटे करण्यात आली.
शिवोली येथील शिवोली रेसिडन्सी जवळ अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी उपनिरीक्षक साहिल वारंग, हवालदार अनंत च्यारी, पोलीस शिपाई आदर्श नागवेकर, अर्जुन सावंत, सखाराम साळगावकर, अनिकेत पेडणेकर, सत्येद्र नास्नोडकर, स्नेहल मळीक, व हेमंत मातोंणकर यांच्यासह त्या ठिकाणी सापळा रचला. या वेळी TS 15 EW 2950 या क्रमांकाची इर्टिगा कार त्या ठिकाणी येऊन थांबली, हणजूण पोलिसांनी त्वरित धाड टाकून गाडीतील मोहम्मद युसूफ ओस्मान (29) रा. हैद्राबाद या तरुणस ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 38.8 ग्राम वजनाच्या 3,65000/- किमतीच्या एकस्टासि नामक अंमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या.
हणजूण पोलिसांनी त्याला अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्याखाली ताब्यात घेऊन अटक केली व पंचनामा करून अंमली पदार्थ व इर्टिगा कार असा मिळून एकूण 15 लाखाचा ऐवज जप्त केला, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक स्नेहल वारंग करीत आहे.