कोरोना महामारीवर एकमेव उपाय म्हणजे योग

.

 

कोरोना महामारीवर एकमेव उपाय म्हणजे योग. योगाची परिभाष, व्याख्या ऋषी मुनींनी आणि योगाचार्यानी वेगवेगळ्या प्रकारे केली आहे, अशा या योगाचा प्रचार सर्वत्र व्हायला पाहिजे. शरीर व मन यांना दिशा देणे म्हणजे योग, योग म्हणजे जोडणे, अर्थपूर्ण जीवन शिकवणार शास्त्र म्हणजेच योग
योग हेच साधन व योग हेच साध्य होय असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी पतंजली योग समीती संचलित योग प्रशिक्षण शिबिराचा समारोप प्रसंगी काढले.
म्हापसा येथील त्रिमूर्ती सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना त्यांनी प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की प्रत्येक माणसाला निरोगी जीवन पाहिजे असत, योग आणि योगासने हे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी झाले आहे. शरीर निरोगी निर्मळ राहण्यासाठी काही आसने व प्राणायाम याच ज्ञान असण आवश्यक आहे. सूंदर निरोगी शरीरात सुंदर मन निवास करत. जीवन निरोगी असण हे अनिवार्य आहे आणि निरोगी जीवनासाठी योग म्हणजे योगासने, प्राणायाम आवश्यक आहे.
यावेळी व्यासपीठावर भारत स्वाभिमान संघटनेचे प्रभारी कमलेश बांदेकर, युवा विभाग प्रभारी गिरीश परुळेकर, योग शिक्षक संदेश बाराजणकर, संध्या खानोलकर, योग शिक्षक तुळशीदास मंगेशकर उपस्थित होते.
कमलेश बांदेकर यांनी योग शिक्षकाना मार्गदर्शन करताना सांगितले की योगाचा प्रचार बादैश तालुक्यातील प्रत्येक गावात व्हायला पाहिजे व त्यासाठी प्रत्येक गावात योग शिबीराचे आयोजन करावे असे आवाहन केले. मानव जीवन सुखी होण्यासाठी प्रत्येकाने योग संकल्प करावा.
सुरुवातीला दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
योग शिक्षकांनी प्रार्थना व स्वागतगीत सादर केले. यावेळी राखी मुरूडकर, हेरंब बांदेकर, अशोक साळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संदेश बाराजणकर यांनी प्रास्ताविक केले तर राघव शेट्टी यांनी ओळख करून दिली. प्रकाश सांगोडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले
सुत्रसंचालन रेशा तळणकर तर डॉ. अरूंधती सडेकर यांनी आभार मानले. तदपूवी गानकोकीळा स्व. लता मंगेशकर यांना क्षदाजली वाहणात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar