गोंयकार काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत : चोडणकर

.

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी सांगितले की, भाजपने, आप आणि तृणमूलच्या संगनमताने गोव्यातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. मात्र आता लोक निष्कर्षापर्यंत पोहोचले असून, त्यांचा मतांचा विभाजनाचा अजेंडा समोर आल्यानंतर लोक आता स्थिर सरकारसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड आघाडीला मतदान करणार.

चोडणकर यांनी बुधवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन मतांचे विभाजन करण्यासाठी येथे आलेल्या इतर राजकीय पक्षांमध्ये सामील झालेल्या काँग्रेस समर्थकांना परत येण्याचे आवाहन केले. “आज गोंयकार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्या माजी कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मी करतो. आम्ही नवीन चेहरे दिले आहेत आणि काँग्रेस बदलत आहे.’’ असे ते म्हणाले.

उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, अॅड. श्रीनिवास खलप, परेश पानकर, संजय बर्डे आदी यावेळी उपस्थित होते.

गोव्यातील लोकांचे काँग्रेस पक्षाशी भावनिक नाते आहे. लोकांनी सुचविल्यानंतर आणि पक्षांतर केलेल्यांना प्रवेश न देता आम्ही आमची रचना बदलली आहे. कधी कधी निवडणुका जिंकणे सोपे असते, पण लोकांची मने जिंकणे सोपे नसते. पण त्यात आम्हाला यश मिळाले आहे.” असे चोडणकर म्हणाले.

“रवी नाईक यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही यांच्या जागी नवीन चेहरा आणला. रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा भाजपशी संबंध होता. पण तो टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर आणि तिथे राजिनामा दिल्ल्या नंतरही आम्ही त्याला तिकीट दिले नाही. ही नवी पिढीतील काँग्रेस आहे. जुनी काँग्रेस आतां भाजप, आप आणि टीएमसीसोबत आहे, ज्यांनी आमच्या नेत्यांना आपल्या गोटात घेतले आहे.’’ असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले.

मतांचे विभाजन करू पाहणाऱ्या पक्षांनी काँग्रेसला एक नवीन दिशा दिली आहे असे ते म्हणाले.

ते म्हणाले की भाजप, आप आणि टीएमसीची मिलीभगत मतांची विभागणी करण्यासाठी आहे हे लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच ते स्थिर काँग्रेस सरकारला मतदान करतील.

“२०१७ मध्ये आम्हाला १७ जागा मिळाल्या आणि आता २०२२ मध्ये आम्हाला २२ पेक्षा जास्त जागा मिळतील. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल.” असे ते म्हणाले.

चोडणकर म्हणाले की, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आणि कंटाळले आहेत. “मुख्यमंत्री त्यांच्या साखळी मतदारसंघात पराभूत होत आहेत. अमित शहा यांची त्यांच्या मतदारसंघात सभा त्याचा पुरावा आहे.’’ असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस संजय बर्डे आणि म्हापसा येथील परेश पानकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे या दोघांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar