येत्या निवडणुकीत गोव्याचा इतिहास बदलणार आहे. गोव्यात 100 टक्के पहिल्यादांच आम आदमी पक्षाचे सरकार येणार याची आपल्याला खात्री आहे. गोव्यातील प्रमुख पक्षाना लोक कंटाळलेले आहेत, शिवोली मतदार संघात एड. विष्णू नाईक सारखा उच्च शिक्षित लोकांच्या समस्या जाणून घेणारा उमेदवार लाभलेला आहे, त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येद्र जैन यांनी केले.
आसगाव येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार एड. विष्णू नाईक यांच्या प्रचार्राथ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार एड. विष्णू नाईक, जेष्ठ कार्यकर्ते प्रा. उमेश कोलवाळकर, अवीन फोन्सेका, सिद्देश भगत, फातिमा, पूजन मालवणकर उपस्थित होते.
काही पक्षाचे उमेदवार लोकांना घाबरवून व काहीजण पैसे देऊन मतांची मागणी करीत आहेत, निवडून येणारा आमदार लोकांना घाबरला पाहिजे, असा उमेदवार निवडा ज्याला कोणी घाबरणार नाही, तसेच तुमच्या मतांची चोरी करणारा उमेदवाराला मते देऊ नका, तुमच्याच घरात चोरी करणाराच चोरीचे काही पैसे परत देऊन मते विकत घेतो. मतांसाठी जो पैसे देतो तो चोर समजावा, यासाठी तुमच्या मूल्यवान मतांची चोरी होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या समोर मतदानचे पाच पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय विष्णू नाईक दुसरा अमित पालयेकर, तिसरा अरविंद केजरीवाल, चौथा आम आदमी पक्ष आणी पाचवा पर्याय झाडू, यापैकी कोणताही पर्याय निवडून आप चे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन सतेंद्र जैन यांनी केले.
यावेळी उमेदवार विष्णू नाईक यांनी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले, तसेच उमेश कोलवाळकर, पूजन मालवणकर, फातिमा यांनी आपले विचार मांडले, अवीन फोन्सेका यांनी सूत्रसंचालन केले.