कळंगुट मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रिकार्डो डिसोझा यांनी सांगितले की, कळंगुटचा आमदार म्हणून निवडून आल्यास प्रत्येक कुटुंबाला एक अपार्टमेंट, मोफत वीज आणि पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. बागा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र वेलींगकर, जॉर्ज डिसोझा, ऍड. नीलकंठ उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार जोसेफ सिक्वेरा आणि काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांच्या बेकायदेशीरपणाचा पर्दाफाश केला. शैलेंद्र वेलींगकर यांनी जोसेफ सिक्वेरा यांच्या सरपंच पदावर असताना केलेल्या गैरकृत्याचा पाढा या पत्रकार परिषदेत वाचला तर जॉर्ज यांनी आपल्या कुटूंबायावर झालेल्या अन्याय कथन केला.