काँग्रेस गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करेल : राहुल गांधी

.

 

मडगाव: भाजप सरकारने आणलेल्या कोळसा हब रद्द करून पर्यावरणाचा ऱ्हास होण्या पासून गोव्याचे संरक्षण करण्याचे आणि गोव्यातील तरुणांना उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार निर्माण करण्याचे वचन काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कुडतरी येथील लोकांना दिले.

राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी कुडतरी मतदारसंघात सभेला संबोधित केले. यावेळी कुडतरीचे उमेदवार मोरेनो रिबेलो उपस्थित होते.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रांसिस सार्दिन आणि इतर नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि नेहमीच सर्वांसाठी काम करतो. “गोव्याला रोजगाराच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि भाजपच्या राजवटीत आर्थिक आपत्ती आली आहे. आम्हाला गोव्याला रोजगार आणि विकासाच्या मार्गावर परत आणायचे आहे.” असे ते म्हणाले.

“काँग्रेसचे मुख्यमंत्री जनतेचा आवाज ऐकतील. आम्ही पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट दिलेले नाही आणि लोकांच्या भावनांचा आदर केला आहे. लोकांच्या इच्छेनुसार आम्ही नवीन चेहरे दिले आहेत.” असे ते म्हणाले.

गोवा हे पर्यटनासाठी ओळखले जाते, त्यामुळे राज्यात कोल हब आणून त्याची भरभराट होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. “मी कोल हब रद्द करण्याचे आणि गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचे वचन देतो.” असे गांधी म्हणाले.

“आम्ही रोजगार निर्मितीसाठी 500 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. याशिवाय, गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवण्यासाठी आमचा प्रस्ताव आहे. जेव्हा या संकल्पना प्रत्यक्षात येतील तेव्हा रोजगाराच्या क्षेत्रात मदत होईल.” असे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, गोव्यातील पर्यटन क्षेत्राची स्थिती बिकट आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून या क्षेत्राला अर्थव्यवस्थेसाठी नवसंजीवनी देण्याची गरज आहे.

सार्दिन म्हणाले की, भाजपने लोकशाहीची हत्या करून सरकार स्थापन केले, त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला पाहिजे.

“भाजपने आमच्या आमदारांना लुटले आणि सरकार स्थापन केले. भाजप लोकांच्या इच्छेविरुद्ध गेला आणि सरकार स्थापन केले. गोवावासीयांनी भाजपला नव्हे तर काँग्रेसला पाठिंबा दिला होता.” असे ते म्हणाले.

सार्दिन म्हणाले की, कोविड काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. “भाजपने कोविडचे चुकीचे व्यवस्थापन केले आणि रुग्णांना ऑक्सिजन देण्यात अयशस्वी झाले.” असे ते म्हणाले.

“काँग्रेसने नेहमीच लोकांच्या हितासाठी काम केले. पण भाजपने नेहमीच लोकांच्या इच्छेविरुद्ध काम केले.” असे सार्दिन म्हणाले.

मोरेनो रिबेलो यांनी लोकांना आवाहन केले की त्यांनी त्यांना मतदान करावे आणि सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्यावा. ‘‘गोव्याच्या भल्यासाठी आम्ही स्थिर सरकार स्थापन करू.’’ असे रिबेलो म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar