सुकुर पर्वरी येथे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज बादैश आयोजित शिवजयंती उत्सव साजरा केला

.

शिवाजी महाराजांनी नुसते परकीच शत्रूचा पराभव करून स्वराज्य स्थापनेचे कार्य केले नाही तर अनेक जनकल्याणकारि सुधारणा करून त्यांनी प्रजेला सुखी केले व सुराज्य निर्माण केले असे प्रतिपादन ह.भ.पा.गजाननबुवा नाईक यांनी काढले.
सुकुर पर्वरी येथे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज बादैश आयोजित शिवजयंती उत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनी आपल्या वागणुकीने हिंदूंना धडा शिकवला की आपण सर्व एका धर्माचे आहोत, बंधू आहोत. आपण एकमेकांचा द्वेष करता कामा नये . शिवाजीच्या स्वराज्य प्राप्तीची कथा जितकी रोमांचकारी आहे तितकीच प्रेरणा दायकही आहे. ती वाचता वाचता आपोआपच शिवाजी महाराजांचा आर्दश आपल्या मनात ठसतो. कारण ते निस्वार्थ भावनेने देशासाठी आणि धर्मासाठी सर्व प्रकारच्या संकटाशी जन्मभर झुंजले आणि शेवटी त्यांनी यश मिळवले. त्यानी आपल्या प्राणांची कधीही तमा बाळगली नाही. यावेळी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक महेश गावकर यांच्या हस्ते निवृत्त पोलीस खात्यातील कर्मचारी जगन्नाथ देसाई ( जेके) याचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक महेश गांवकर यांनी सांगितले की क्षत्रिय मराठा समाजातील लोकांसाठी आपल्या कडे अनेक योजना आहेत, यासाठी लोकांनी आपणाला सहकार्य करावे. आपल्या समाज बांधवांना आपण सदोदित सहकार्य करणार आहोत.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲड, अर्जुन शेटगावकर, जगन्नाथ देसाई, गजानन नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य विठ्ठल पासैकर यांनी केले तर प्रमोद शेटगावकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar