माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया !

.

माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया !

प्रस्तावना – मराठी भाषा गौरव दिन हा प्रतीवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 या दिवशी घेण्यात आला. मात्र सध्या मराठी भाषेची अवस्था दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. मराठी भाषेतील शब्दांची जागा इंग्रजी, उर्दू, फारशी आदी भाषांतील शब्दांनी घेतली आहे. मराठीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. त्यामुळे मराठी भाषेतील शुद्धत्व, सोज्वळता हरपत चालली आहे. ती तेजोहीन झाली आहे आणि काही तुरळक भाषाभिमानी वगळता याला कोणीही विरोध करत नाहीत. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने तिचे वैभव टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत, यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव – महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव पाठवला होता. बरेच दिवस रेंगाळलेल्या या प्रस्तावाला साहित्य अकादमीच्या भाषिक समितीने चांगला प्रतिसाद देऊन त्याविषयी केंद्रशासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी सांस्कृतिक मंत्रालयापुढे येणार आहे. आज जगात मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या ११ कोटींच्या वर आहे. या संख्येनुसार जगात मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीत निर्मिती झालेली साहित्यसंपदा श्रेष्ठ दर्जाची आहे. बाराशे वर्षांपूर्वीही मराठी भाषा समृद्ध होती. आज भारतात सर्वत्र मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक असल्याने ती केवळ एका राज्याची भाषा राहिली नसून राष्ट्रीय भाषा झाली आहे, असा युक्तीवाद महाराष्ट्राच्या वतीने पाठवलेल्या प्रस्तावात करण्यात आला होता.

मराठी भाषेवरील आक्रमणे – महाराष्ट्राप्रमाणेच मराठी भाषेवरही यवनी सत्तेकडून करण्यात आलेली आक्रमणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी परतवून लावली. त्यानंतर भाषेवर झालेल्या इंग्रजीच्या आक्रमणाला परतवून लावण्याचे कार्य निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य सर्व आंदोलने सांभाळून भाषाशुद्धीचे कार्य अनेक वर्षे चालवून ते नेटाने पुढे नेले. दैनंदिन व्यवहारात अनेक स्वकीय शब्द वापरायची सवय महाराष्ट्राला झाली ती सावरकरांमुळेच ! सध्या शिक्षण आणि शासकीय कामकाज यांमध्ये जास्त करून इंग्रजी भाषाच वापरली जात असल्याने मराठी बोलतांना आपण इंग्रजी भाषेतील शब्द कळत-नकळत बोलून जातो. मराठी बोलतांना जसे आपण इंग्रजी शब्द वापरतो, तसे मराठी लिहितांनाही इंग्रजी लिखाणाची पद्धत वापरतो. मराठी भाषा अशुद्ध व्हायला तेही एक कारण आहे. भाषाशुद्धीची चळवळ मराठी माणसाने मराठीत बोलावे आणि मराठी बोलतांना इंग्रजी शब्द वापरू नयेत इथपर्यंतच मर्यादित ठेवून चालणार नाही, तर ‘मराठी लिहितांना इंग्रजी पद्धतीने वाक्यरचनाही करू नये’, असेही सांगायला हवे.

मराठी भाषा संवर्धन – जेव्हापासून महाराष्ट्र शासनाने मराठी विषय हा ऐच्छिक केला, तेव्हापासून या भाषेेला इंग्रजी अन् हिंदी भाषा समांतर ठरल्या. या ऐच्छिकतेचा परिणाम म्हणून आता घराघरातील मुले मराठीकडे पाठ फिरवून इंग्रजी भाषा शिकत आहेत. भारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे इंग्रजी बोलता येणे, हा हुशार असणार्‍या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे. भारतियांमध्ये स्वभाषेविषयी सतत न्यूनगंड दिसून येतो. त्यामुळे इंग्रजीला उत्तर द्यायचे, तर आपल्या बोलीभाषांना मान द्यायला शिकले पाहिजे. या भाषा भावनांच्या भाषा आहेत. पैशाच्या भाषा नाहीत. त्यांच्याशी असलेले भावनिक नाते टिकवले पाहिजे. फक्त मराठी बोलणे किंवा पोशाख घालणे म्हणजेच मराठी जपणे नाही. तर महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, संत- साहित्य परंपरा, मराठी संस्कृती या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि हाच वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे. अनेक मराठी भाषिक मराठी आणि हिंदी भाषा येत असतांनाही एकमेकांशी इंग्रजीतून बोलतात. जेथे मराठी किंवा हिंदी भाषा समजत नसेल, येत नसेल आणि त्यामुळे संवाद साधतांना अडचण येत असेल, तेथेच इंग्रजीचा वापर करावा. जेथे अशी अडचण नसेल, तेथे स्वभाषेचा अभिमान जागृत ठेवण्यासाठी मराठीतच संवाद साधावा.

सात्त्विक मराठी भाषा टिकवण्याचे उपाय

1. स्वाक्षरी मराठीतून करा !

2. ‘गुड मॉर्निंग’च्या ठिकाणी ‘शुभ प्रभात’ म्हणा !

3. मुलांना ‘मम्मी-डॅडी’ नको, तर ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवा!

4. दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ म्हणण्यापेक्षा ‘नमस्कार’ म्हणून बोलण्यास प्रारंभ करा !

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar