भाजपच्या मिशन कमिशनमुळे राज्याच्या तिजोरीला  4 कोटींचे नुकसान  

.

 

पणजी: गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम  विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी गुरुवारी आरोप केला की भाजपच्या मिशन कमिशनमुळे राज्याच्या तिजोरीला चार कोटींचे नुकसान झाले आहे. वीज खांबावरुन नेणाऱ्या टीव्ही व इंटरनॅट केबल्सचा वेव्हार वीज खात्या कडून काढून घेवून भाजपच्या महामंत्र्यांच्या नातेवाईकांना दिल्याने हे नुकसान झाले आहे असा दावा त्यांनी केला आहे
पणजीकर यांनी गुरुवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली आणि जाहिरात फलक आणि इंटरनेट, स्थानिक टीव्ही चॅनेल केबल्ससाठी विजेचे खांब वापरण्यासाठी मंजूर केलेल्या निविदेची चौकशी करण्याची मागणी केली.

यावेळी काँग्रेस प्रवक्ते तन्वीर खतीब, प्रदीप नाईक, हिमांशू तिवरेकर उपस्थित होते.

पणजीकर म्हणाले की, भाजपच्या महामंत्री यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही निविदा काढण्यात आली आहे. पणजीकर म्हणाले की, वीज विभाग गेल्या सहा वर्षांपासून गोव्यातील विविध केबल नॅटवर्क आणि इंटरनेट सेवा कंपन्यांकडून विविध उपविभागांद्वारे भाडे घेत होते.

“तथापि, गेल्या एका वर्षापासून भाडे गोळा करणे बंद केले आहे, जेणेकरून ते त्यांच्या  भांडवलदार मित्राला हा वेव्हार हाताळण्यास देऊ शकतील.” असे ते म्हणाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार वीज विभाग खांब वापरण्यासाठी सर्व इच्छुकांकडून भाड्याची रक्कम आगाऊ घेत असे.  मात्र आता भाजप सरकारच्या सूचनेवरून विभागाने अत्यंत गुपचूप एका कंपनीला किमान २ कोटी रुपयांमध्ये हा कंत्राट दिला आहे.  वीज विभाग भाडे वसूल करत असताना सुमारे 6 ते 8 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. आता भाजपने भाडे वसुलीचे हे काम त्यांच्या नातेवाइकांना केवळ २ कोटींमध्ये दिले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीचे चार कोटींहून अधिक नुकसान होणार आहे, असे ते म्हणाले.

निविदा प्रक्रिया बेकायदेशीरपणे करण्यात आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पणजीकर यांनी केली आहे.

“या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी झाली पाहिजे.” असे ते म्हणाले .

ते म्हणाले की गोवा केबल टीव्ही नेटवर्क आणि सर्व्हिस असोसिएशनने त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची अनेकवेळा विनंती केली होती तरी भाजप सरकार त्यांच्या समस्या सोडवण्यात आणि त्यांना मदत करण्यात अपयशी ठरले आहे.

“सरकारने केवळ त्यांच्या  भांडवलदार मित्राला खूश करण्यासाठी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.” असे ते म्हणाले.

काँग्रेसचे सरकार आल्यावर आवश्यक तेथे भूमिगत केबल टाकण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, तनवीर खतीब यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या राज्यातील लोकांना परत आणण्याची मागणी केली.
“रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. मात्र आमच्या लोकांना परत घरी आणण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रदिपनाईक म्हणाले की, पंचायत प्रभागांचे आरक्षण व डीलिमिटेशन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि त्यासाठी लोकांना विश्वासात घेतले पाहिजे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar