श्री शांता विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात

.

 

विद्याभारती संचालित सडये शिवली येथील श्री शांता विद्यालयामध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थोर वैज्ञानिक श्री रमेश कुमार व व सौभाग्यवती राधा रमेश कुमार उपस्थित होते.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रजिता सांगाळे , शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सी. व्ही रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच शिक्षक वर्गाने विज्ञान गीत सादर करून या कार्यक्रमाचा आरंभ केला
मुख्याध्यापिका सौ प्रजिता सांगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शब्द सुमनांनी स्वागत तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. विज्ञानाचे असेल आपल्या जीवनामध्ये असलेले अनन्यसाधारण महत्त्व यावरही त्यांनी आपले विचार व्यक्त केले

प्रमुख पाहुणे यांनी त्यांची विविध संशोधने संशोधनात्मक प्रवास , जगामधील विविध भागांमधील अनुभव अंटार्टिकावरील स्वानुभव, दृकश्राव्य माध्यमातून तेथील
तपशील माहिती यावर त्यांनी भाष्य केले तसेच तसेच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व ज्ञानजिज्ञासा त्यांनी जागृती केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला

श्री.शांता विद्यालयामध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला होता त्यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .मये येथील गो शाळेला शैक्षणिक सहल घेण्यात आली होती . तेथील गाई संबंधी व त्यांच्या आरोग्य संबंधित माहिती व याचा पर्यावरणाला होणारा फायदा याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच विज्ञान शिक्षक श्री नवनाथ सावंत व शिक्षक श्री जगदीश कारापूरकर यांनी सर्पमित्र श्री.अमृत सिंह यांना भेट देऊन त्यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कामगिरीबद्दल माहिती एकत्र गेली.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गणिताची ,विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी त् या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे या हेतूने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये कुमारी राणी झाॅ ,कुमार जावेद शहा , सुहाना , सान्विक केरकर यांना बक्षीस मिळाले.

विज्ञान दिनाचे निमित्त विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित प्रयोगशील असे प्रकल्प तयार केले होते त्यांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी प्रियंका कारभारी हिने केले तसेच आभार प्रकटन विद्यार्थिनी कुमारी रिद्धी गोल्तेकर यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar