पेडणे तालुका मर्यादित सिने नृत्य स्पर्धेत सुरेखा किनळेकर तर वरिष्ठ गटात वेदीका तेली प्रथम

.

श्री सोमनाथ स्पोर्ट्स अॕण्ड कल्चरल क्लब, मळीवाडा,नानेरवाडा आणि कोंडलवाडा, पेडणे, गोवातर्फे शिवरात्रौत्सवाचे औचित्य साधून श्री सोमनाथ देवालयाच्या रंगमंचावर पेडणे तालुका मर्यादित सिनेनृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि रांगोळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे उद् घाटन श्री देवी भगवती देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष विनोद सावळ देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. व्यासपिठावर पेडणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. उषा रुद्रेश नागवेकर, देवस्थान कमिटीचे खजिनदार प्रदिप देशप्रभू, संस्थेचे अध्यक्ष पद्मनाभ आसोलकर, कार्याध्यक्ष सुरज काजळे आणि आनंद नाईक उपस्थित होते.
मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ रोजी सकाळी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत अनिशा मातोंडकर, सायली नागवेकर, आश्लेषा पटेकर म्हामल, स्वेतल देवजी आणि सुशमा आसोलकर यांना अनुक्रमे पहिली पाच बक्षिसे देण्यात आली. उत्तेजनार्थ पाच बक्षिसे अनुक्रमे आचल गाड, शर्मिष्ठा नागवेकर, कवीन नागवेकर, माया पटेकर आणि खुषी शिरोडकर यांना देण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध चित्रकार पी.ए. सुर्यवंशी आणि कला शिक्षक राजमोहन शेट्ये यांनी केले होते.
पेडणे तालुका मर्यादित वेशभूषा स्पर्धेत बारा वर्षाखालील गटामध्ये रोहित उमेश निंबाळकर, सुरेखा किनळेकर, सात्विक नाईक, श्रेयांश सुभाजी, सिद्धता आंबेकर यांना अनुक्रमे पहिली पाच बक्षिसे देण्यात आली तर उत्तेजनार्थ पाच बक्षिसे अनुक्रमे स्वरा पंडित, संदेश गडेकर, श्रीषा साहिल कलंगुटकर, मानसी मनोज गवस आणि दक्षित सुभाजी यांना देण्यात आली.
सिने नृत्य स्पर्धेत दहा वर्षाखालील गटामध्ये सुरेखा किनळेकर, रोहित निंबाळकर, सई राहूल पाटील, करिष्मा गवंडी आणि श्रीषा शेट्ये यांना अनुक्रमे पहिली पाच बक्षिसे देण्यात आली तर मानसी गवस, पलक प्रशांत गडेकर, सित्वी गडेकर, त्रिशा पालयेकर व ओवित शिरोडकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सिने नृत्य स्पर्धेत दहा वर्षावरील गटामध्ये वेदीका तेली, स्वरांगी शेट्ये, चेतन निंबाळकर, कविन नागवेकर, आणि नीशा नागवेकर यांना अनुक्रमे पहिली पाच बक्षिसे देण्यात आली तर खुषी शिरोडकर, साईश्री गडेकर, सोनाक्षी मयेकर प्रियांका पिरनकर सिद्धता आंबेकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. वेशभूषा आणि सिनेनृत्य स्पर्धेचे परिक्षण सौ.नेहा सागर आजगावकर आणि कु. सुकन्या सदानंद सावळ देसाई यांनी केले होते.
स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संत सोयरोबानाथ आंबियेचे मराठीचे प्राध्यापक नवसो परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष पद्मनाभ आसोलकर, आनंद नाईक, स्पर्धेचे दोन्ही परिक्षक अनुक्रमे सौ. नेहा सागर आजगावकर आणि कु. सुकन्या सदानंद सावळ देसाई ऊपस्थित होते. नेहा आजगावकर यांनी स्पर्धेविषयी आपले मत व्यक्त केले.
संपुर्ण कार्यक्राचे सूत्रसंचालन नवसो परब यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय पटेकर यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar