हरमल पंचक्रोशीच्या लारया फर्नांडिसचे उल्लेखनीय यश.
हरमल येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी लारया फर्नांडिस हिने विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
कांदोळी येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित राज्यस्तरीय एकल कोंकणी गीत गायन स्पर्धेत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कु. लारया हिने उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले तसेच कोकणी भाषा मंडळातर्फे डीएमसी महाविद्यालय आसगाव म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कोकणी वक्तृत्व स्पर्धेतही कुमारी लारीया हिने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या दोन्ही स्पर्धांसाठी तिला शिक्षिका सिद्धी नाईक आणि शांभवी नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. लारयाच्या या यशासाठी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, व्यवस्थापिका स्मिता पार्सेकर, प्राचार्य गोविंदराज देसाई, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयराम परब व इतर सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
हरमल पंचक्रोशीच्या लारया फर्नांडिसचे उल्लेखनीय यश.
.
[ays_slider id=1]