कुडचडे येथे जागतिक पर्यटन दिवस उत्साहाने दयानंद कला केंद्रातर्फे श्री. गणेश दर्शन संकल्पनेव्दारे गोवा पर्यटन,

.

कुडचडे दि.
कुडचडे येथे जागतिक पर्यटन दिवस उत्साहाने दयानंद कला केंद्रातर्फे श्री. गणेश दर्शन संकल्पनेव्दारे गोवा पर्यटन, भारत पर्यटन, गोवा विकासमंडळ इत्यादीच्या सहयोगाने रवींद्र भवनात भारत पर्यटन आयोजित अतुल्य भारत प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात साजरा करण्यात आला.ह्या समारंभास मा. निलेश काब्राल बांधकाम मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पारंपरिक समई प्रज्वलित करून प्रदर्शनाचे उदघाटन केले. या प्रसंगी बोलताना श्री. काब्राल म्हणाले की आंतरराष्ट्रीय समाज एकत्रीत ठेवण्याचे कार्य करण्यास पर्यटनच खरे माध्यम व अशा कार्यक्रमाद्वारे पर्यटनाच्या महत्वाची जागृती होते. आजच्या कार्यक्रमावरून कुडचडे जागतिक स्तरावर पोहोचले असेल असे मी आवर्जून म्हणेन केंद्राचा दूसरा फेस्टिवल चंदेरी सुध्दा पर्यटकांना आकर्षित करणारा असा आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्याच्य सोबत कुडचडे काकोडा नगरपालिका अध्यक्ष डॉ.जॅस्मीन ब्रागांझा, गोवा पर्यटन महामंडळ पुर्व सदस्य केशव नाईक अध्यक्ष मोर्तू नाईक, समाज सेवक मोहनदास देसाई, ज्येष्ठ कलाकार आनंदी नाईक, वनीता वस्त ,इ. उपस्थित होते. सदर प्रदर्शनात देशातील प्रसिद्ध पर्यटन, तिर्थस्थळे, प्राचिन वारसा स्थळे,ऐतिहासीक स्थळे वगैरे दर्शविणारे फलक, पोस्टर्स, मांडण्यात आले व प्रदर्शनास भेट देणारे विद्यार्थी , नागरिकांना विविध राज्यातील प्रेक्षणिय स्थळाची माहिती पुस्तिकाचा संच भारत पर्यटन पणजी कार्यालयाकडून मोफत देण्यात आली. सचिव बंटी उडेलकर यांनी या वेळी प्रास्ताविक करून विविध स्पर्धाची माहिती उपस्थितांना दिली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें