गोवा शासनाच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या एकोणीस वर्षांखालील विभागीय रस्सीखेच स्पर्धेत गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी व मुलींनी उत्तर गोवा विभाग-एक मधील अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद

.

गोवा शासनाच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या एकोणीस वर्षांखालील विभागीय रस्सीखेच स्पर्धेत गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी व मुलींनी उत्तर गोवा विभाग-एक मधील अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद पटकावले.
क्रीडा शिक्षक अभय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत कोरगांवकर,गुलाम मसूद कुरेशी,तौफिक शेख, रेहान शेख,लकी कुयेल्लो,हुसेन मिर्जी, नरेंद्र सिंग,सागर नाईक,मलीक धारवाड व हिमांशू कुमार यांनी मुलांचे,तर सिया तेंडुलकर,श्रावणी गुरव,जुनिता एक्का,रेश्मा राठोड, सिलसिला नवास, सानिया बेग,फ्रान्सिस्का राणी,गुंजन. हळर्णकर, सानिया शेटसनदी व दिया लोहार यांनी मुलींचे प्रतिनिधित्व केले.
विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर पेडणेकर, सचिव पुरुषोत्तम कामत,पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार तारकर व प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी विजेत्या संघांचे व मार्गदर्शक शिक्षक अभय सावंत यांचे अभिनंदन केले आहे.
(छायाचित्र:- रस्सीखेच स्पर्धेत विभागीय विजेतेपद पटकावलेले श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुलांचे व मुलींचे संघ प्राचार्य गजानन मांद्रेकर,क्रीडा शिक्षक अभय सावंत व ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा पै पाणंदीकर यांच्या समवेत.)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar