*१० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या ‘आर्.बी.आय्.’च्या आदेशाचे पालन करा ! –

.

 

 

*१० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या ‘आर्.बी.आय्.’च्या आदेशाचे पालन करा ! – ‘सुराज्य अभियान’ची मागणी*
पणजी, ४ मे – १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया (‘आर्.बी.आय्.’) च्या आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोवा राज्य माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री दीपक बांदेकर आणि पणजी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री संजीव गावस देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन रिझर्व बँकेचे अधिकारी श्री. क्लिंट यांना देण्यात आले आहे. या वेळी ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री सत्यविजय नाईक, युवराज गावकर आणि सुशांत दळवी यांचा समावेश होता. शासकीय अधिकार्‍यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दर्शवला आहे.
‘सुराज्य अभियान’ निवेदनात म्हणते, ‘‘भारतीय चलन पद्धतीनुसार ‘आर्.बी.आय्.’ वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. १० रुपयांची सर्व नाणी वैध असल्याचे ‘आर्.बी.आय्.’ने प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळवले आहे; मात्र अफवा किंवा गैरसमज यांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. नागरिकांना याविषयी स्पष्टता नसल्याने त्यांच्याकडे १० रुपयांची नोट देण्याविना अन्य पर्याय उरत नाही. तसेच त्यांच्याकडे केवळ नाणी असल्यास त्यांना वस्तू खरेदी करण्यावर बंधने येतात आणि त्यांची गैरसोय होऊन त्यांना मनस्ताप होतो. यास्तव १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचा ‘आर्.बी.आय्.’चा आदेश सर्व दुकानदार आणि विक्रेते यांच्यापर्यंत पोचवावा आणि यासाठी शासनाच्या वतीने आदेश काढावा. १० रुपयांची नाणी घेण्यास नकार देणार्‍यांवर राजद्रोह कायद्याखाली कायदेशीर कारवाई करावी. नागरिकांच्या अधिकाराविषयी जागरुकता निर्माण करावी. ‘सुराज्य अभियान’ ने गोव्यासह विविध राज्यांमध्ये १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याविषयी संबंधित जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन याविषयी जागृती करण्याची विनंती केली आहे.

आपला नम्र,
श्री. सत्यविजय नाईक,
(संपर्क क्रमांक : 9158954455)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar