*गोव्यातील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त एकवटणार 350 हिंदु संघटना !*
*फोंडा* - आधी अखंड भारतातून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आदी देश तोडण्यात आले. आताही हिंदु समाजाला कमकुवत करून भारताचे तुकडे करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात इस्लामीकरण आणि ख्रिस्तीकरण चालू आहे. भारतातील 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. अनेक ठिकाणी हिंदू आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो देशाला अन् समाजाला जोडू शकतो. हिंदु धर्म विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील आणि देशाचे अन् हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यंदा 9 देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांचे 850 हून अधिक प्रतिनिधी एकवटणार आहेत. यात गोव्यातील 50 हून अधिक मान्यवर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, *अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.* फोंडा येथील हॉटेल ‘पॅन अरोमा’ येथे आयोजित पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक हे उपस्थित होते.
*या वेळी ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की,* काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे भीषण वास्तव मांडणार्या ‘दी कश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने भारतात मोठी जागृती घडवली असली, तरी हिंदू तरुणींमध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती होणे अपेक्षित आहे. या दृष्टीने हिंदू अधिवेशनात चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात येईल. सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने सारख्या संघटनांना ‘हलाल सर्टिफिकेट’ देण्यापासून प्रतिबंधित केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. दुसरीकडे आतंकवाद आणि धर्मांतर यांना प्रोत्साहन देणार्या डॉ. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून ‘गेम जिहाद’च्या माध्यमांतून हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे सर्व धोके ओळखून स्वत:च्या आणि देशाच्या रक्षणासाठी हिंदूंनी वैधानिक मार्गाने सिद्ध झाले पाहिजे, यासाठी हे अधिवेशन हिंदूंना प्रेरणा देणारे ठरेल.
*या वेळी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक म्हणाले की,* गोवा येथे गेल्या 11 वर्षांपासून होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर होण्यास प्रारंभ झाला आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करणारी आज अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे व्यासपीठ हे एकप्रकारे ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या परिषदांना वैश्विक पातळीवरील प्रत्युत्तर आहे. या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय पातळीवर, तसेच राज्य आणि जिल्हा पातळीवर हिंदु संघटनांच्या एकत्रिकरणातून ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करण्यासाठी प्रत्यक्ष नियोजन करण्यात येणार आहे. समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘मंदिरांची मुक्ती’, ‘घरवापसी’ आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनात विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंदिरांचे सुप्रबंधन, ‘अभिव्यक्ती - स्वातंत्र्य कि दायित्व ?’ आदी विषयांवर परिसंवाद असणार आहेत.
या अधिवेशनाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, काशी-ज्ञानवापी मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा, ‘विश्व हिंदु परिषदे’चे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, ‘भारत माता की जय’ संघटनेचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यासह अनेक उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेलवरून आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सत्यविजय नाईक यांनी केले आहे.
आपला विनीत,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, गोवा.
(संपर्क क्रमांक : 9326103278)


