श्री शांता विद्यालयात ‘वार्षिक नियोजना’वर शिक्षकांना कार्यशाळा

.

श्री शांता विद्यालयात ‘वार्षिक नियोजना’वर शिक्षकांना कार्यशाळा
श्री शांता विद्यालयात वार्षिक नियोजनावर शिक्षकांना कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ श्री.दिलीप बेतकेकर ,व्यवस्थापक श्री.शिवाजी पाटील ,मुख्याध्यापिका सौ.प्राजीता सांगाळे,पिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.संदीप पाळणी तसेच श्री शांता विद्यालय आणि पिपल हायस्कूल चा शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली .शिक्षक श्री.उमेश महालकर यांनी कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले .
वार्षिक नियोजन कशाचे करावे आणि कसे करावे ?यावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री .दिलीप बेतकेकर यांनी सांगितले कि ‘मनुष्यबळा मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,विद्यार्थी ,शुभेच्छुक,व्यवस्थापन,पत्रकार ,संसाधन व्यक्ती हे महत्वाचे असतात . वेळेचे नियोजन करताना वर्ष,महिना ,आठवडा ,तासिका ,शालेय वेळ आणि सुट्टीचे दिवस पाहून वेळेचे नियोजन करावे . विद्यार्थ्यांना पूरक असी संसाधने आपल्याकडे कोणकोणती आहेत हे पाहणे जर नसतील तर ती उपलब्ध करणे.त्याचं बरोबर प्रकल्प अहवाल तयार करताना आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागतील, विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोय होईल आणि त्यासाठी खर्च किती येईल यासाठी खर्चाच अंदाजपत्रक तयार करणे गरजेच आहे .
विद्यालयातील कार्याचा वाटप कसा करावा ?यासाठी गरजेच्या गोष्टींची यादी करणे,कामाची यादी ,मल्टीटास्किंग कर्मचाऱ्यांची कर्तव्ये काय असणार ? ,प्रमुख पाहुण्याची यादी तयार करणे इत्यादी .विद्यालयात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचा फेसबुक ,व्हाटऑंप वरून प्रचार आणि प्रसार करा . ‘पाढे प्रकल्प’ यामध्ये विद्यार्थ्यांना कितीपर्यंत पाढे येतात हे जाणून घ्या .त्यानंतर मुलांना पाढ्यांचा तक्ता देऊन त्यांच्याकडून पहिले उभे, नंतर आडवे आणि शेवटी खालून वर असे पाढे पाठ करून घ्या. तसेच विद्यार्थ्यामध्ये रस निर्माण होण्यासाठी ते संगीतमय पद्धतीने म्हणून घ्या .‘खुली पुस्तक परीक्षा’ या बाबतीत मुलांना कस शिकवायचं? प्रश्न पत्रिका कशाप्रकारे काढायची ?त्याचबरोबर मुलांना वाचनाची आवड कशी लागेल ?ह्या गोष्टी या परीक्षेबाबत लक्षात घ्याव्या . ‘विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन’ दाखवायचं झाल तर ते वेगवेगळ्या विषयातून दाखवता येते उदा .स्नेहसंमेलनामध्ये विज्ञानातील १० प्रयोगाचे सादरीकरण ,कवितेवर नृत्य करणे ,आसने करणे इत्यादी .त्यानंतर विद्यार्थी नियतकालिकात विद्यार्थ्यांचे लेख ,एक दिवस दप्प्तराशिवाय शाळा ,मुलांची छोटीशी सहल ,आहार संस्कार ,वेगवेगळ्या वस्तूंवर संशोधन उदा.झाडांची नावे,पानामधील फरक ओळखणे .त्यामुळे विद्यार्थ्यानमध्ये वाढणारी निरीक्षण क्षमता.
शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेणे ,वृत्तपत्रातील लेख विद्यार्थ्यांना वाचायला देणे व वेगवेगळ्या विषयाची चित्रणे गोळा करायला सांगणे उदा पर्यावरण .नियोजन बैठक घेणे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा समावेश असणे गरजेचे आहे.विद्यार्थी हस्ताक्षर सुधार योजना यासाठी काय करावे जेणेकरून त्यांच्या हस्ताक्षराचा विकास होईल हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे .नियोजनासाठी निवासी शिबीर घेणे ,माहिती देणारे विविध तक्ते विद्यालयात असणे ,शिक्षकांसाठी विविध विषयांच्या कार्यशाळा घेणे उदा सूत्रसंचालन ,कथाकथन इ .पालकांची वैशिष्टे जाणून घेणे तसेच एक्सेल शीटमध्ये पालकांची माहिती घालून ठेवणे . विद्यार्थ्याच्या घरी भेट देणे व परिस्थितीचा आढावा घेणे ,शाळा आणि परिसर यांची स्वच्छता,ग्रामसंपर्क इत्यादी . या बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन त्याचे बारीक आणि रीतसर पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री .उमेश महालकर यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षक श्री संगम चोडणकर यांनी केले .शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar