संविधानाचा अपमान करणार्‍या काँग्रेसने जनतेची माफी मागावी अन् संविधानाविषयी भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु

.
संविधानाचा अपमान करणार्‍या काँग्रेसने जनतेची माफी मागावी अन् संविधानाविषयी भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

     काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी नुकतेच एका प्रचारसभेत बोलतांना भारताने संविधान गोमंतकियांवर बलपूर्वक लादले असल्याचे गंभीर वक्तव्य केले आहेअसे विधान तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरही केले होतेअसेही ते म्हणालेहा एकप्रकारे ‘संविधान बचाव’च्या नावाने टाहो फोडणार्‍या काँग्रेसने संविधानाचा केलेले घोर अपमानच आहे. ‘पोटात एक आणि ओटात एक’ अशी दुटप्पी अन् राष्ट्रघातकी भूमिका घेणार्‍यांवर जनतेने कसा काय विश्वास ठेवावात्यामुळे संविधानाचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेस पक्षाने जनतेची जाहीर माफी मागावी आणि संविधानाविषयीची त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

गोमंतकीयांवर संविधान लादले म्हणणे’ म्हणजे ‘तुम्हाला भारतीय संविधान मान्य नाही का?’ गोवा तुम्हाला आजही पोर्तुगीजांची वसाहत वाटते का?  गोवा स्वतंत्र होऊन ६४ वर्षे झाल्यानंतरही गोव्याला एकप्रकारे पोर्तुगीजांची वसाहत समजणार्‍या पोर्तुगीजधार्जिण्या काही लोकांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकलेली नाही.

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे गोमंतकीय जनतेसाठी दुहेरी नागरिकत्व मिळण्याची मागणी केली असल्यांचे म्हटले आहेमध्यंतरी गोव्यातील एका बेटावर ध्वजवंदन होऊ दिले नसल्याची बाब समोर आली होतीतसेच गोव्यातील काही हजार लोकांनी गोव्याला स्वतंत्र राष्ट्र करण्याची मागणी मध्यंतरी केली होतीया सर्व घटनांतून गोव्यात जाणीवपूर्वक फुटीरतावादी वृत्ती वाढण्याचे काम चालू आहेअसे दिसून येतेअशा फुटीरतावादी वृत्तीचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतोदुहेरी नागरिकत्वाची मागणी ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक आहेतअशा विचारसरणीच्या लोकांना जर काँग्रेस उमेदवारी देत असेलतर काँग्रेसची विचारसरणी वेगळी कशी मानता येईल असा प्रश्न निर्माण होतोखरे तर हा एकप्रकारे देशद्रोह असून या प्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेअशी आमची सरकारकडे मागणी आहे.


आपला नम्र,
 
डॉ. मनोज सोलंकी,
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, गोवा
(संपर्क : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar