थिवी दि. ११ (नवा)
म्हापसा वाताहार लायन्स क्लब ऑफ थिवि चा ३२ वा अधिकार ग्रहण सोहळा क्लब हाऊस थिवि येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिचोली चे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी शपथग्रहण अधिकारी वासुदेव वालावलकर उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लब थिवि चे नुतन अध्यक्ष प्रशांत चणेकर व त्यांच्या संचालक मंडळला शपथग्रहण अधिकारी वालावलकर यांनी शपथ दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. शेट्ये यांनी यावेळी लायन्स क्लब अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असते याबद्दल त्यांनी त्याचे कौतुक केले व असेच उपक्रम हाती घ्यावेत असे पुढे बोलताना सांगितले.
लायन्स क्लब थिवि ची नूतन कार्यकारिणी पुढिलप्रमाणे अध्यक्ष प्रशांत चणेकर, सचिव_ दिपक कडकडे खजिनदार श्रवण वैणैकर. नुतन सदस्य शर्मिला चणेकर उमेश शिरोडकर, गोविंद खलप, ॲड. दिपक तिळवे, शशिकांत नाईक, वरूण हळदणकर, रूपेश ठाणेकर,
यावेळी माजी अध्यक्ष श्रवण वैणैकर यांनी स्वागत केले तर लाॅरेन्स डिसोझा यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला.
सचिव दिपक कडकडे यांनी आभार मानले.
फोटो भारत बेतकेकर
लायन्स क्लब थिवि नुतन कार्यकारिणी अध्यक्ष प्रशांत चणेकर व इतर