पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

.
पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी
बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

पणजी, १० ऑगस्ट – बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत. तेथे एक हिंदू नगरसेवक, एक हिंदू पत्रकार यांची हत्या झाली आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भारत सरकारने तेथील हिंदुं समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. हिंदु राष्ट्र समन्वय समितीने वतीने पणजी येथी आझाद मैदान येथे १० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी या आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनात ‘हिंदू रक्षा महाआघाडी’, ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल’, ‘इस्कॉन’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘भारत माता की जय’, ‘सनातन रक्षा दल’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘सनातन संस्था’ आदी संघटनांनी सहभाग घेतला.
बांगलादेश येथील अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या. प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी. भारत सरकारने हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा.  तसेच यापूर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पहाता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.या प्रकरणी भारत सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. या वेळी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे सर्वश्री नितीन फळदेसाई, ‘इस्कॉन’चे प्रचारक मिलींद सावंत आणि प्रवीणचंद्र, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे राजेंद्र भोबे, ‘विश्व हिंदू परिषद’चे मंत्री संजीव कोरगावकर, ‘भारत माता की जय’चे राजेंद्र वेलिंगकर, ‘सनातन रक्षा दल’चे उत्तर गोवा अध्यक्ष संजय गावडे,  ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे सुभाष वेलिंगकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे गोविंद चोडणकर यांनी संबोधित केले.

आपला नम्र,
श्री. सत्यविजय नाईक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती,
(संपर्क क्र.: ९१५८९५४४५५)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar