विकास हायस्कूल: गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी

.

विकास हायस्कूल: गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणे केंद्र पातळीवरील 47 वा केंद्रस्तरीय कथाकथन मेळावा वळपे पेडणे येथील विकास हायस्कूल मध्ये पार पडला .
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जयवंत पाटील, कोषाध्यक्ष शैलजा बाळे , वीरनोडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णानाथ परब, पेडणे केंद्रप्रमुख नागेश गोसावी, विकास हायस्कूलच्या पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उल्हास देऊलकर, गोवा प्रदेश साने गुरुजी कथा मालेचे कार्यकारणी सभासद दिलीप मामल , हृदयनाथ तांबोसकर उपस्थित होते .
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हायस्कूलच्या गाणं रुंद गटाने सरस्वती स्तवन व “खरा तो एकची धर्म ” ही प्रार्थना सादर केली.
केंद्रप्रमुख नागेश गोसावी यांनी मान्यवरांच परिचय करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कथाकथना नंतर बक्षिसे वितरण झाली .स्पर्धेचे परीक्षण भानुमती राणे ,सुरेखा पागी ,विनाया धूपकर, दिलीप मामल, विलास काळे व शैलजा बाळे यांनी केले .एकूण 87 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
कार्यक्रमाचे व्यवस्था विकास हायस्कूल वळपे यांनी केली ,तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शारदा परब यांनी केले
विकास हायस्कूल: प्राथमिक गटातील प्रथम तीन आणि दोन उत्तेजनार्थ विजेते पुढे प्रमाणे आहे
स्वरा संदीप राव( सरकारी प्राथमिक विद्यालय भुतवाडी ) सिषीका गोपाळ परब (सरकारी प्राथमिक विद्यालय तोरसे) हार्दिक सचिन तारी( हुतात्मा मनोहर पेडणेकर विद्यालया पेडणे )यश भालचंद्र शेट (श्री दुर्गा इंग्लिश स्कूल पारसे )सात्विक दामोदर नाईक (श्री भगवती हायस्कूल पेडणे)

उच्च प्राथमिक गट श्रीअश ज्ञानेश्वर सुभाजी (हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल)अवनी तीरोडकर (Viscount High School Pernem) काजल राजू राठोड (हुतात्मा मनोहर पेडणेकर विद्यालय पेडणे)श्रेयन काळोजी (श्री भगवती हायस्कूल पेडणे) पलक दिपक गडेकर (हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल )

माध्यमिक गट साची संजय परब (हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल )सना सुधाकर साटेलकर( हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल ) मंजिषा महाले (Viscount High School Pernem) साईदीप संदीप कांबळी (माद्रे हायस्कूल मादे)सेजल शामसुंदर नाईक (प्रज्ञा हायस्कूल देवसु)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें