पीपल्स परिवारातर्फे डॉ. सुर्लकर जयंती साजरी
पणजी : पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक स्व.डॉ.जगदीश सुर्लकर हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी व्यक्तिमत्व होते .त्यांनी ३५ वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहेत ,असे प्रतिपादन पीपल्स उच्च माध्यमिकच्या प्राचार्या सिद्धार्थी नेत्रावळकर यांनी केले.
पीपल्स परिवाराने नऊ डिसेंबरला आयोजीत केलेल्या डॉ. जगदीश सुर्लकर यांच्या ८९ व्या जयंती दिन कार्यक्रमात त्या उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना बोलत होत्या . यावेळी त्यांच्यासोबत प्राथमिक विभाग प्रमुख आनंदी सुर्लकर , माध्यमिक विभाग प्रमुख मरिलिया एस्टीव्हज आदी मान्यवर उपस्थित होते . पीपल्स परिवारातर्फे डॉ. सुर्लकर यांचा ९ डिसेंबर हा जन्मदिवस ‘ जॅम्स डे’ म्हणून साजरा केला जातो.
सुरुवातीला आनंदी सुर्लकर , सिदधार्थी नेत्रावळकर व मरिलिया एस्टिव्हज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले . तदनंतर मान्यवरांसह सर्व उपस्थितांनी डॉ. सुर्लकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून कृतज्ञता व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिकच्या विज्ञान शिक्षिका वैशाली नाईक यांनी केले.