बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा ! – ॲडव्होकेट संघटनेची केंद्राकडे मागणी
पणजी, १८ डिसेंबर – बांगलादेश येथे अटकेत असलेले ‘इस्कॉन’चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची सुटका करणे आणि बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार रोखण्ो यांसाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारे निवेदन आदर्श राष्ट्ररचनेसाठी कार्यरत असलेल्या ॲडव्होकेट संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या वतीने पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यासंबंधीचे निवेदन पणजी येथील उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. महादेव आरोंदेकर यांना सुपूर्द करण्यात आले. ॲडव्होकेट संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री यश नाईक, रूपेश गावस, सुशांत धाऊसकर, सुनील सिरसाट, सुधांशू मोरजकर, संतोष अनुर्लेकर आणि सौ. सुरक्षा गावस यांचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक दशके बांगलादेशी येथील हिंदूंना शिस्तबद्धरित्या लक्ष्य केले जात आहे. वर्ष १९५१ मध्ये बांगलादेश येथील हिंदूंची संख्या २२ टक्के होती आणि आता ती ८ टक्क्यांवर आली आहे. बांगलादेशी येथील अल्पसंख्य असलेले हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतातील अल्पसंख्याक मुसलमानांच्या मागण्यांसाठी आग्रही असलेले भारतातील तथाकथित निधर्मी आणि पुरोगामी गट बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराला अनुसरून मूक गिळून गप्प आहे. भारत सरकारने बांगलादेश येथे ‘इस्कॉन’चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची त्वरित सुटका करून त्याला सुरक्षा पुरवणे आणि बांगलादेश येथे अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करणे यांसाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणला पाहिजे. भारत सरकारने बांगलादेश तेथील हिंदू समुदायाच्या सुरक्षा आणि मानवी हक्क यांसाठी संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे साहाय्य घेतले पाहिजे. या निवेदनााच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
आपला विश्वासू,
ॲडव्होकेट सुनील शिरसाट
संयोजक, ॲडव्होकेट संघटना
Photo Caption – उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. महादेव आरोंदेकर यांना निवेदन देतांना ॲडव्होकेट संघटनेचे शिष्टमंडळ