गोवाऑनलाइन सेवा आता व्हाट्सएपद्वारे उपलब्ध*

.

*गोवाऑनलाइन सेवा आता व्हाट्सएपद्वारे उपलब्ध*

*आल्तिन, १५ मार्च, २०२५:* गोवा सरकार आता आपली गोवाऑनलाइन सेवा व्हॉट्सॲपसोबत एकत्र करून नागरिकांना अधिक सोयीस्कर बनवित आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या नेतृत्वाखालील या उपक्रमामुळे रहिवाशांना सरकारी कागदपत्रे, दाखले, बिल, पेमेंट पावत्या आणि सूचना सहज उपलब्ध होणार आहेत.

गोवाऑनलाइन, हे वेब-आधारित माध्यम, २०१७ मध्ये स्व. डॉ. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आयटी मंत्री श्री रोहन ए. खंवटे, यांच्या सक्रिय पाठिंब्याने सुरू करण्यात आले होते. हे ऑनलाइन माध्यम सर्व नागरिकांसाठी विशेषत: महामारीच्या काळात वरदान ठरले होते. नवीन एआय-सहाय्यित माध्यम नागरिकांना आणखी चांगला अनुभव देऊन व्हाट्सएपद्वारे २४१ यावर सरकारी सेवांमध्ये प्रवेश देईल.

*माननीय मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांनी डिजिटल प्रशासनासाठी राज्याच्या वचनबद्धतेवर भर देताना सांगितले,* की “आम्ही सरकारी सेवा अधिक कार्यक्षम आणि सुलभ बनवण्यासाठी समर्पित आहोत. मॅन्युअल प्रक्रियेतून गोवाऑनलाइन नावाच्या वेब आधारित माध्यमाची सुरुवात, त्यानंतर ‘ग्रामीण मित्र’च्या सहाय्याने कधीही, कुठेही नागरिकांना दारापाशी सेवा वितरण आणि आता थेट व्हॉट्सॲपद्वारे नागरिकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचवत आहोत.”

गोव्याच्या व्हॉट्सॲप-आधारित सेवेचे उद्दिष्ट प्रशासन खऱ्या अर्थाने लोक-केंद्रित बनविणे आणि सरकारी सेवा सहज उपलब्ध करून देणे हे आहे. अशाप्रकारे गोवा सरकार वापरकर्त्यांना विविध सेवा कार्यक्षमतेने हाताळण्यास मदत करण्यासाठी कीवर्ड-आधारित प्रणाली देण्याचा प्रयत्न करत आहे. या एकत्रीकरणासह, गोवाऑनलाइनचे वापरकर्ते त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात, देय तारखेचे स्मरणपत्र मिळवू शकतात, प्रत्येक स्तरावर मदत आणि सेवा-प्रवेशासाठी प्रक्रियेचे रीमाइंडर्स मिळवू शकतात तसेच व्हॉट्सअपद्वारे सर्व २४१ सेवा मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात.

ही सुविधा डिजिटल सशक्तीकरणातील एक महत्त्वपूर्ण झेप दर्शवते. तसेच सार्वजनिक सेवा नागरिकांच्या दारापाशी ते बोटांच्या क्लिकपर्यंत पोचणार याची खात्री करते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें