वैदिक गणित स्पर्धेत पीपल्स हायस्कूलचे सुयश
पणजी : मंगेशी -फोंडा येथील ‘एसआरएस ‘ तर्फे आयोजित राज्यस्तरीय वैदिक गणित स्पर्धेत मळा-पणजी येथील पीपल्स माध्यमिक विद्यालयाच्या प्रतिक कैसरे या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक, प्रथम कैसरे याने पाचवा क्रमांक तर आरव वेलुसकर या विद्यार्थ्यांने तेरावा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यभरातील सहभागी ५८ शाळांमधून पीपल्स माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला . या परीक्षेला एकूण ५४४ विद्यार्थी बसले होते.
नुकत्याच मंगेशी येथील देसाई प्रतिष्ठान सभागहात आयोजित कार्यक्रमात मांगिरिश विद्यादायिनी संस्थेचे अध्यक्ष अरूण देसाई यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी एसआरएसचे संचालक सागर साकोर्डेकर व राधा साकोर्डेकर , पीपल्सच्या गणित विषयाच्या अध्यापिका मधुश्री तिंबले , मातृछाया न्यासचे अध्यक्ष अनुप केणी तसेच अन्य मान्यवर ऊपस्थित होते.