*‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’वर भर देत हायरने ग्रेटर नोएडामधील कारखान्यात घातली नव्या एसी प्रोडक्शन आणि इजेंक्शन मोल्डिंग युनिट्सची भर, १००० कोटी रुपयांची गुंतवणूक*
*भारत, मार्च २०२५:* हायर अप्लायन्सेस इंडिया या जागतिक पातळीवर मेजर अप्लायन्सेसमध्ये सलग १६ वर्षे अव्वल क्रमांकावर असलेल्या ब्रँडने आपल्या एसी उत्पादनात अत्यंत महत्त्वपूर्ण क्षमतावृद्धी केली आहे. ग्रेटर नोएडा येथील आपल्या कारखान्यात त्यांनी नव्या इंजेक्शन मोल्डिंग सुविधेचे नुकतेचे उद्घाटन केले. भारतातील या एका आघाडीच्या होम अप्लायन्सेस उत्पादक कंपनीने ‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’ उपक्रमाला बळकटी देण्याच्या आपल्या प्रयत्नात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
हा अत्यंत महत्त्वाचा समारंभ उत्तर प्रदेशचे माननीय मुख्य सचिव श्री. मनोज कुमार सिंग आणि हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष श्री. एनएस सतिश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे मुख्य सचिव श्री. अनुराग यादव आणि ग्रेटर नोएडा अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी कुमार एनजी उपस्थित होते. या लक्षणीय टप्प्यातून हायरची ‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील उत्पादनाला बळकटी मिळेल, नाविन्यतेला चालना मिळेल आणि परिणामी देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
या नव्या सुविधेसाठी हायरने लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक केली आहे. २०२४ ते २०२८ या काळात हायरतर्फे अतिरिक्त १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यातून अतिरिक्त ३५०० रोजगारनिर्मिती होऊन उत्तर प्रदेशच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भर पडणार आहे. भारतातील उत्पादन विभागाला अधिकाधिक वृद्धिंगत करण्याच्या हायरच्या धोरणात्मक योजनांचा भाग म्हणून ही गुंतवणूक केली जात आहे.
या नव्या एसी कारखान्यामुळे सध्याच्या वार्षिक १.५ दशलक्ष युनिट्स इतक्या उत्पादन क्षमतेत भर पडणार आहे. नव्या कारखान्यातील २.५ दशलक्ष युनिट्च्या क्षमतेमुळे एकूण उत्पादन क्षमता ४ दशलक्ष युनिट्सवर पोहोचेल. त्याचप्रमाणे इंजेक्शन मोल्डिंग सुविधेमुळे महत्त्वाच्या सुट्ट्या भागांच्या उत्पादनाला बळकटी मिळणार आहे. परिणामी हायरच्या सर्वच उत्पादन विभागांतील उत्पादन प्रक्रियेत अधिक परिणामकारकता मिळेल.
हायर इंडियातर्फे सध्या ९० टक्के अप्लायन्सेस स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात. आता या नव्या सुविधांमुळे आयातीवरील अवलंबित्व आणखी कमी होऊन उत्पादन प्रक्रियेला गती मिळेल आणि भारत आणि आसपासच्या बाजारपेठांमधील हायर उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करता येईल.
या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव श्री. मनोज कुमार सिंग म्हणाले, “ग्रेटर नोएडामध्ये हायर इंडियाने त्यांची उत्पादन क्षमता वृद्धिंगत करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याबद्दल त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन. माननीय मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ जी यांचे दूरदृष्टी असणारे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश आता एक महत्त्वाचे उत्पादन केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे आणि हायर इंडियाच्या या बांधिलकीमुळे आघाडीच्या जागतिक उत्पादकांसोबत राज्याचे सहकार्य वृद्धिंगत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यात आणि जागतिक पातळीवर उत्पादन क्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात हे उत्पादन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आम्हाला विश्वास आहे. या कार्यात यश मिळो अशा आमच्या हायर इंडियाला शुभेच्छा!”