राष्ट्रीय युवा किसान संघटनेने गोवा प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर व सचिव चंद्रहास दाभोलकर यांचा सत्कार

.

नवी दिल्लीत भरलेल्या राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या अखिल भारतीय अधिवेशनात गोव्यातील दोन पत्रकार तथा संघटनेचे गोवा प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर व सचिव चंद्रहास दाभोलकर यांचा प्राईड प्लाझा हॉटेल नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला.

ह्या सोहळ्यास अभिनेते बिंदू दारासिंग,तिरुपती बालाजीचे महंत श्री शंभुनाथ, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल त्रिवेदी,महामंत्री विनोदभाई सोळंकी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष विकी कौल,दिल्ली प्रदेश अध्यक्ष अनिता ठाकूर,स्वेता दाभोलकर व अन्य उपस्थित होते.

भारत देशात गोवा राज्याची तुलना निसर्गसौंदर्य स्थळ म्हणून गणले जाते.गोव्यात शेतकरी स्वकष्टाने तसेच शासकीय पातळीवर सेवेचा लाभ घेऊन स्वयंनिर्भर बनले आहेत.त्यांच्या उत्कर्षासाठी संघटना कार्य करणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी सांगितले.गोव्यात संघटनेचा विस्तार केला जाणार असल्याचे बेतककर यांनी सांगितले.गोव्यात राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे कार्य सुयोग्य पध्दतीने चालू असून किसानांच्या समस्या व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाल्यास उत्पादन क्षमता वाढू शकते व त्यातून भारत देश अधिक गतीने कृषिप्रधान होऊ शकतो असे अध्यक्ष त्रिवेदी यांनी व्यक्त केले.

भारत सरकारने कृषी विधेयकातील तीन कायदे रद्दबातल केल्याने सरकार अभिनंदनास पात्र आहे परंतु खास अध्यादेशातुन कायदे रद्द करायला हवे असे मत त्रिवेदी यांनी मांडले.यावेळी देशांतील 17 राज्यातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता.यांच्याहस्ते शाल,स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.गोवा राज्य निसर्गाने नटलेले असून समुद्रकिनारे,मंदिरे,चर्चेस तसेच आदरातिथ्यसाठी प्रसिद्ध आहे.शेतकरी शेतीला प्राधान्य देत असून सरकारने विविध योजना तयार केल्या मात्र  कित्येकांनी स्वासामर्थ्यावर शेती उत्पादनात प्रगती साधली असल्याचे प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर यानी सांगितले.सोहळ्याचे सुत्रनिवेदन वीणा वाधिनी तर विकी कौल यानी आभार मानले.

फोटो
नवी दिल्ली—राष्ट्रीय युवा किसान संघटनेने गोवा प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर व सचिव चंद्रहास दाभोलकर यांचा सत्कार केला,त्या सोहळ्यास अभिनेते बिंदू दारासिंग, राहुल त्रिवेदी,महामंत्री विनोदभाई सोळंकी व अन्य

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें