इंग्लिश हायस्कूल ,केरी- पेडणेचा दहावी परीक्षेत गुणात्मक निकाल : शाळेत प्रथम आलेली साक्षी गावडे हिला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर

.

न्यू इंग्लिश हायस्कूल ,केरी- पेडणेचा दहावी परीक्षेत गुणात्मक निकाल : शाळेत प्रथम आलेली साक्षी गावडे हिला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर

 

हरमल , प्रतिनिधी

केरी पेडणे येथील केरी – तेरेखोल परिसर विकास, कल्याण आणि शिक्षण संस्था संचालित न्यु इंग्लिश माध्यमिक विद्यालयाचा गोवा शालांत मंडळातर्फे वर्ष २०२१-२२साठी घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ८९. १९ टक्के निकाल लागला आहे. शाळेची विद्यार्थीनी साक्षी शरद गावडे हिने ९०टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यासाठी तिला व्यवस्थापनाच्यावतीने एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. शाळा या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने साक्षीसाठी ही सुवर्ण भेट आहे.

नव्वद टक्के आणि त्याहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती शालेय व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आली होती. त्याची साक्षी गावडे प्रथम मानकरी ठरली आहे. साक्षीने हिंदी (९१),विज्ञान (९०)आणि समाजशास्त्र (९७) या विषयात नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

यावर्षी दहावी परीक्षेला विद्याललयातून ३७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते , त्यातील ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १२ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , तर ८ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

प्रांजल प्रशांत कदम ( ८५. ६) शाळेत दुसरी तर , भुमी नंदकुमार दाभोलकर( ८५. १७ ) हिने शाळेत तिसरी येण्याचा मान पटकावला. रिचा रवी मठकर, श्रीधर शामसुंदर मांद्रेकर, अभिषेक अनिल कलंगुटकर , साईशा संजय हर्जी, सानिया संजय हर्जी, ध्रुव सुरेश नाईक, समीप सहदेव चोडणकर, अमिषा जयेश दाजजी, नीता प्रशांत पेडणेकर हे विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर, उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर , निवृत्त मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस, व्यवस्थापक तातोबा तळकर , संस्थेचे सचिव नंदकुमार झालबा , खजिनदार ब्रजेश केरकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गंगाराम मठकर ,व्यवस्थापनाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

फोटो : (डावीकडून)
साक्षी गावडे, प्रांजल कदम, भूमी दाभोलकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें