हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यातील विविध विद्यालयांमध्ये ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाचे आयोजन

.

 

 

*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यातील विविध विद्यालयांमध्ये ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाचे आयोजन*
पणजी, १२ ऑगस्ट – क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी देशासाठी केलेला त्याग, समर्पण, राष्ट्रासाठी त्यांनी सोसलेला त्रास, आदी गुणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी अन् त्यांच्यामध्ये प्रखर राष्ट्रभावना निर्माण व्हावी, या हेतूने हिंदु जनजागृती समितीने राज्यातील विविध विद्यालयांमध्ये ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. श्रीस्थळ, काणकोण येथील शासकीय माध्यमिक विद्यालय, कुजिरा-बांबोळी येथील मुष्टीफंड विद्यालय, आदी ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचा एकूण सुमारे १ सहस्र २७५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मुष्टीफंड विद्यालयात ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णा च्यारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रमोद तुयेकर आणि सुशांत दळवी यांचीही उपस्थिती होती.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य असल्याचे सांगून ‘क्रांतीगाथा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून क्रांतीकारकांची माहिती तळागाळापर्यंत पोचणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त झाली.

*विद्यालयांमध्ये प्रवचनांच्या माध्यमातून ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी प्रबोधन*
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कस्तुरबा मातोश्री विद्यालय, पणजी; बोरी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय; सडये येथील शांता विद्यालय आदी ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर विद्यार्थीवर्गाचे प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. या अंतर्गत प्लास्टिकजा राष्ट्रध्वज न वापरणे, ध्वज फडकावतांना ध्वजाचा योग्य तो सन्मान आणि पावित्र्य राखले जाईल याची काळजी घेणे आदींविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

*‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी फलक प्रसिद्धीच्या माध्यमातूनही प्रबोधन*
हिंदु जनजागृती समितीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयीचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावून याविषयी सामाजिक प्रबोधन आरंभले आहे. राज्यात ठिकठिकाणी असे फलक लावण्यात आले आहेत.

*आपला विश्वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य, समन्वयक*
*हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : 9326103278 )*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें