कोकण गिड्डा गाईचे वैशिष्ट्ये

.

कोकण गिड्डा (कपिला) या गायीच्या जातीमध्ये कोकणातील उष्ण-दमट आणि अति पावसाच्या हवामानात, डोंगराळ भागात चराई करून पोषण आणि उत्पादन करण्याची अधिक क्षमता आहे. या जातीची जनावरे तपकिरी, काळा अथवा पांढरा, भूरा आणि मिश्र अशा विविध रंगाची आहेत. जनावरे लहान ते मध्यम आकाराची, घट्ट बांध्याची असून 250 ते 350 किलो वजनाची असतात.

डोके मध्यम असून त्यावर लहान आकाराचे प्रथम वर नंतर मागे वळलेली सरळ टोकदार शिंगे, चेहरा सरळ, कान मध्यम आकाराचे सरळ समांतर रेषेत असतात. डोळे, मुस्कट, खूर आणि शेपटीचा गोंडा सहसा काळ्या रंगाचा असतो. लहान ते मध्यम आकाराचे वशिंड आणि मानेखाली लोंबकणारी पोळ (आयाळ) असते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली आणि काटकपणा असल्याने रोगास बळी पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. स्वभावाने गरीब, शांत असतात, गाईची कास लहान असून सड लहान ते मध्यम आकाराचे असतात. उपलब्ध स्थानिक गवत आणि भात पेंढ्यांवर गायीचे सरासरी दूध उत्पादन 2.25 किलो दरदिवशी असते. बैल काटक, शेतीसाठी आणि ओढकामास उपयुक्त आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar