गोव्यात शालेय अभ्यासक्रमात ‘इन्क्विझिशन’चा इतिहास समाविष्ट करा

.
गोव्यात शालेय अभ्यासक्रमात ‘इन्क्विझिशन’चा इतिहास समाविष्ट करा !

 

       फोंडा – मापंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकतेच नालंदा येथे प्राचीन विश्वविद्यालयाच्या जवळ नवीन कॅम्पसचे उद्घाटन केलेज्या प्रमाणे प्राचीन विश्वविद्यालयाचे एकप्रकारे पुनरूत्थान चालू आहेतसेच उत्तरप्रदेशातील विद्यमान योगी सरकारने राममंदिराचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा स्तुत्य निर्णय घेतलातेथे केवळ राममंदिरच नव्हेतर धार्मिकपौराणिकआध्यात्मिक विषयही मुलांना शिकवले जाणार आहेतअशा प्रकारे उत्तरप्रदेशातील योगी सरकार निर्णय घेऊ शकतेतर गोव्यातील भव्य आणि प्राचीन मंदिरांचा इतिहासपोर्तुगीज काळात झालेला मंदिरांचा विध्वंस, ‘इन्क्विझिशन’द्वारे झालेले अत्याचारगोमंतकियांनी मंदिरे आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेला लढाहा इतिहास का शिकवला जाऊ शकत नाहीगोमंतकाचा सत्य इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जावाअशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहेया दृष्टीने गोव्यात २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत होणार्‍या १२ व्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईलअशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिलीफोंडा येथील हॉटेल ‘पॅन अरोमा’ येथे आयोजित पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्रीसत्यविजय नाईक आणि अधिवक्ता शैलेंद्र नाईक हे उपस्थित होते.

      या वेळी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्रीसत्यविजय नाईक म्हणाले कीयंदा गोव्यात होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी श्रीदत्त पद्मनाभ पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद महाराजतसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्य संचालक श्रीराजन भोबे यांनाही अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले आहेया अधिवेशनाला अमेरिका येथून नीलेश नीलकंठ ओकत्रिनिदाद आणि टोबॅगो येथून स्वामी ब्रह्मस्वरुपानंद महाराजघाना येथून श्रीनिवास दासनेपाळमधून श्रीशंकर खराल आणि इंडोनेशिया येथून श्रीधर्म यशा हे येणार आहेतया अधिवेशनास देशभरातून हिंदुत्वनिष्ठ अधिवक्तेउद्योजकविचारवंतलेखकपत्रकारमंदिर विश्वस्ततसेच अनेक समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेतया वेळी अधिवक्ता शैलेंद्र नाईक म्हणाले की२९ ते ३० जून या कालावधीत ‘अधिवक्ता संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहेयामध्ये हिंदु संघटनाकार्यकर्ते यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात न्यायालयीन साहाय्य करणारेविविध आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे देशभरातील अधिवक्ते या संमेलनात सहभागी होणार आहेतयातून कार्याची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

           या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारेतसेच समितीच्या HinduJagruti’ या ‘युट्यूब’ चॅनेलवरून होणार आहेजगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावाअसे आवाहन श्रीसत्यविजय नाईक यांनी शेवटी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar