गुळवेल ( अमृतवेल )

.

गुळवेल (अमृतवेल )

गुळवेल एक वनस्पती आहे जी मुख्यत्वे जंगल, शेतातील चिखल अथवा डोंगरावर मिळते. ही उष्ण प्रकृतीची असते. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे दिसते. उन्हाळ्याच्या दिवसात या वनस्पतीवर लहान लहान आकाराची पिवळी फुलं दिसून येतात. जी नर झाडावर एकत्र फुललेली दिसतात आणि मादी झाडावर मात्र एकट्या स्वरूपात असतात. यावरूनच झाड नक्की कोणत्या स्वरूपाचे आहे ते कळून येते. गुळवेलचे वैज्ञानिक नाव हे टीनोस्पोरा कार्डिफोलिया असं आहे. यामध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. त्यामुळे गुळवेलला अमृतासमान मानले जाते. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गुळवेल हे झाडाला अगदी मिठी मारून वाढते. त्यामुळे त्या झाडाचे औषधीय गुणही गुळवेलामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे जर कडुलिंबाच्या झाडावर गुळवेल वाढवली तर ती अत्यंत लाभदायी मानली जाते.

महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात. गुळवेलाचे फायदे व नुकसान दोन्ही असतात. पण आपण आधी गुळवेलाचे फायदे जाणून घेऊया.

१)प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे.
२)साधारण 10-15 दिवसांनंतरही तापाची समस्या कमी होत नसेल तर त्याला क्रोनिक फिव्हर अर्थात जुना ताप असं म्हटलं जातं. तुम्ही या समस्येवर गुळवेलाचा उपयोग करून घेऊ शकता.
३)गुळवेलाची औषधीय गुणांमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याची गुण आहेत. डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठीही हे उत्तम ठरते.
४)गुळवेलाच्या पावडरचे नियमित तुम्ही उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते.
५)गुळवेल हे औषधीय गुणांचे भंडार समजण्यात येते. यामध्ये अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचीही नावे आहेत. याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल लाभदायक ठरते.
६)शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्वासासंबंधी समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग होतो. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे.
७) गुळवेलात अँटिएजिंग घटक आढळतात. त्यामुळे शरीरातील आजार दूर करण्यासह वाढत्या वयाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो.
८)गुळवेलात असणाऱ्या इम्यूनोमॉड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारकशक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रोगांशी लढण्यासह एफ्रडिजीयॅक प्रभावामुळे सेक्सची इच्छा वाढविण्यास मदत करतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें