जुने गोवे चर्च संकुलातील ‘प्रसाद’ योजनेचा खवंटेतर्फे आढावा

.

जुने गोवे चर्च संकुलातील ‘प्रसाद’ योजनेचा खवंटेतर्फे आढावा

पणजी ः पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी सोमवारी जुन्या गोव्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांवर सुविधा विकसित करण्यासाठी ‘प्रसाद’ योजनेची आढावा बैठक घेतली आणि प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. 2024 साली अपेक्षित दर्शन सोहळ्यापूर्वी अंमलबजावणीला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जेसुइट पुजारी, स्थानिक आमदार राजेश फळदेसाई, गोवा पोलीस आणि इतर भागधारकांसह बॅसिलिका ऑफ बॉम जीझसच्या कार्यालयाच्या आवारात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खवंटे म्हणाले की, आराखड्याची अंतिम रूपरेषा पूर्ण होईपर्यंत बैठका होतच राहतील जातील. त्यानंतरच योजना पुढे नेली जाऊ शकते.
जुने गोव्याचे ‘प्रसाद’ योजनेसाठी नाव सुचविण्यात आल्यानंतर
स्मारकाची बाजू, वारसा स्थळ, धार्मिक बाजू आणि येथे येणार्‍या यात्रेकरूंना आणि पर्यटक म्हणून येणार्‍यांनादेखील सर्वोत्तम अनुभव देणे आवश्यक आहे, असे खवंटे म्हणाले.
पर्यटन स्थळांवर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, जुन्या गोव्यातील चर्चचे स्मारक आणि वारसा लक्षात घेऊन ‘प्रसाद’ योजनेसाठी हे स्थळ निवडण्यात आले होते. सामाजिक चलनशीलता, शौचालयांसारख्या पायाभूत सुविधा या ‘प्रसाद’ योजनेसाठी आवश्यक आहेत, असे खवंटे म्हणाले.
‘आम्हाला सज्ज रहायला हवे. कोरोनानंतर पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जुने गोव्यातील पर्यटकांतही मोठी वाढ झाली आहे. 2024 साली दर्शन सोहळा असल्याने यासाठी तयार रहायला पाहिजे.
आमचे पथक धर्मगुरुंशी बोलून या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी कशी करता येईल, हे पाहणार आहे, असे ते म्हणाले.
जुने गोव्यातील चर्च संकुल हे केंद्र सरकारच्या ‘पिलग्रिमेज रिज्युविनेशन अँड स्पिरिच्युअल ऑगमेंटेशन ड्राईव्ह’ (प्रसाद) या योजनेअंतर्गत निवडण्यात आले आहे. यासाठी 41.49 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. या अंतर्गत बॉम जीझस व जुने गोवे चर्च संकुलाचा समावेश आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें