लालिगाकडून नवीन धोरणात्‍मक स्थिती व आंतरराष्‍ट्रीय ब्रॅण्डिंग सादर करत नवीन युगाचा शुभारंभ 

.

लालिगाकडून नवीन धोरणात्‍मक स्थिती व आंतरराष्‍ट्रीय ब्रॅण्डिंग सादर करत नवीन युगाचा शुभारंभ

नवीन ब्रॅण्‍ड अधिक मोठे, अधिक आंतरराष्‍ट्रीय बनत आणि पूर्वीपेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत लालिगाने गेल्‍या १० वर्षांमध्‍ये परिवर्तन केलेल्‍या उत्‍क्रांतीला सादर करतो

पणजी– लालिगाने आज घोषवाक्‍य ‘द पॉवर ऑफ आवर फुटबॉल’अंतर्गत नवीन ब्रॅण्‍ड व धोरणात्‍मक स्थितीचे अनावरण केले आहे. या लाँचमधून समाजाला प्रेरित करण्‍यासोबत समाजात सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याप्रती स्‍पर्धेची कटिबद्धता दिसून येते. या परिवर्तनामधून आकार व जागतिक प्रतिष्‍ठेच्‍या संदर्भात लालिगाने गेल्‍या दशकभरात केलेली उत्‍क्रांती दिसून येते. ही स्‍पर्धा कोणत्‍याही क्रीडा कंपनीच्‍या सर्वात व्‍यापक आंतरराष्‍ट्रीय नेटवर्कसह जगातील सर्वात मोठी फुटबॉल इकोसिस्‍टम बनली आहे आणि आता ११ कार्यालयांच्‍या व प्रतिनिधींच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून ४१ देशांमध्‍ये उपस्थित आहे. गेल्‍या १० वर्षांमध्‍ये या स्पर्धेने सर्व क्षेत्रांमध्‍ये शाश्‍वत विकास पाहिला आहे आणि राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय प्रतिष्‍ठा रँकिंग्‍जमध्‍ये मान्‍यताकृत ब्रॅण्‍ड म्‍हणून स्‍वत:चे नाव स्‍थापित केले आहे.

लालिगा येथील ग्‍लोबल ब्रॅण्‍ड अॅण्‍ड स्‍ट्रॅटेजीचे प्रमुख एंजल फर्नांडिज म्‍हणाले, ‘‘गेल्‍या १० वर्षांमध्‍ये आम्‍ही आमच्‍या क्रीडाच्‍या सकारात्‍मक मूल्‍यांच्‍या माध्‍यमातून लोकांना प्रेरित करण्‍याची जबाबदारी घेतली आहे, जी आम्‍ही आमचे क्‍लब्‍स, आमचे चाहते आणि स्‍पर्धा व संबंधित क्रियाकलापांच्‍या आमच्‍या संपूर्ण इकोसिस्‍टमच्‍या माध्‍यमातून सतत दाखवत आहोत. नवीन ब्रॅण्‍ड या परिवर्तनाचे प्रतीक आहे आणि ‘द पॉवर ऑफ आवर फुटबॉल’चे प्रतिनिधीत्‍व करते, ज्‍यासह आम्‍ही आपल्‍या सर्वांना प्रेरित करणाऱ्या आणि व्‍यक्‍ती व समाज म्‍हणून विकसित होण्‍यास आपल्‍याला मदत करणाऱ्या स्‍पर्धेचा भाग असण्‍याच्‍या अभिमानाची पुष्‍टी देऊ इच्छितो.’’

नवीन ब्रॅण्डिंग: वैशिष्‍ट्ये, लोगो व रंग
हा संदर्भ लक्षात घेत लालिगा आता कॅपिटल अक्षरांमध्‍ये LALIGA या एकाच शब्‍दामध्‍ये लिहिण्‍यात येणार आहे. या शब्‍दामधून ‘द पॉवर ऑफ आवर फुटबॉल’ सादर होते आणि नियमांचे पालन करणाऱ्या, तसेच समाजाप्रती जबाबदार असलेल्‍या व भेदभावाचे निर्मलून करण्‍यासाठी लढणाऱ्या लीगचा भाग असण्‍याच्‍या अभिमानाला दाखवते.

नवीन ब्रॅण्‍ड लोगो सुरूवातीची आद्यक्षरे ‘LL’ याद्वारे सादर करण्‍यात आला आहे. लोगाची निवड मैदानावरील व मैदानाबाहेरील दोन प्रमुख क्षणांशी संलग्‍न आहे, ज्‍यामधून फुटबॉलप्रती आवड दिसून येते. पहिला क्षण म्‍हणजे गोल केल्‍यानंतर खेळाडूंचे सेलिब्रेशन्‍स व ते गुडघे मैदानावर टेकवून खाली बसत त्‍यांच्‍या शरीराच्‍या सिल्‍हूटसह तयार केलेले अक्षर ‘L’ आणि दुसरा क्षण म्‍हणजे चाहते, जे त्‍यांच्‍या टीमचे गोल्‍स किंवा यशाला साजरे करताना त्‍यांच्‍या हातांसह अक्षर ‘L’ तयार करतात.

लालिगाचा नवीन कॉर्पोरेट रंग कोरल (पॅन्‍टोन रेड ०३२सी) आहे, जो फुटबॉलचा अभिमान, आवड, ऊर्जा व उत्‍साहाचे प्रतीक आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar