एअरबीएनबी या खासगी कंपनीला प्रोत्साहन दिल्याचा अ‍ॅड. फरेरा यांचा सरकारवर आरोप

.

एअरबीएनबी या खासगी कंपनीला प्रोत्साहन दिल्याचा अ‍ॅड. फरेरा यांचा सरकारवर आरोप

पणजी : गोव्यात येणार्‍यांना एअरबीएनबीची सेवा वापरण्याचे आवाहन करताना राज्याच्या पर्यटन विभागाकडून प्राधान्य देण्यात येत असलेल्या एअरबीएनबी या पूर्णपणे खासगी संस्थेचा मोफत प्रचार करून गोवा सरकार घोटाळा करीत असल्याचा आरोप हळदोणाचे काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी केला आहे.
गोवा होस्टिंग हँडबुककडे लक्ष वेधताना अ‍ॅड. फरेरा म्हणाले की, यामध्ये होमस्टे मालक आणि प्रवर्तकांना एअरबीएनबीवर सूचिबद्ध कसे करावे याबद्दल तपशीलवार सूचना दिल्या जातात, आमदार म्हणाले की, एअरबीएनबी एक व्यावसायिक उपक्रम आहे. ते गोव्याबाहेरून आपला व्यवसाय चालवत आहेत. २०२२ मध्ये गोवा सरकारने एअरबीएनबीसोबत करार केला आणि २०२३ मध्ये हे गॅझेट (होमस्टेसाठी) ही योजना घेऊन येते. एअरबीएनबी हे घर चालवणारे मालक नाहीत. ती केवळ एक व्यावसायिक संस्था आहे जी ते चालवत आहे. सरकारला केवळ एकाच संस्थेला प्रोत्साहन का द्यावे लागते? पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यावसायिक उपक्रमाला चालना देत आहात का? एअरबीएनबी ताबा घेत आहे आणि वर्चस्वाच्या तयारीत आहे, असे अ‍ॅड. फरेरा म्हणाले.
पर्यटन खात्याच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान पुढे बोलताना अ‍ॅड. फरेरा यांनी पर्यटनमंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडीस हे मंत्र्यांशिवाय परदेश दौरे कसे करत आहेत, असा सवाल उपस्थित केला.
पर्यटनमंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडीस यांनी केलेल्या दौर्‍यांवर बोलताना अ‍ॅड. फरेरा यांनी मंत्र्यांचा अधिकृत विदेश दौरा नसताना देखील त्यांचे ओएसडी शॉन मेंडीस यांच्या परदेश दौर्‍यांचा खर्च सरकारी तिजोरीच्या निधीद्वारे कसा दिला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शॉन मेंडीस यांनी आयटीबी बर्लिन येथे १.०४ कोटी रुपये खर्च करून प्रवास केला आणि अन्य एका रोड शोसाठी फ्रँकफर्ट, झुरिच, व्हिएन्ना आणि पॅरिस येथे १.९० कोटी रुपये खर्च केले.
याची चौकशी होणे गरजेचे आहे. सरकारचा एखादा अधिकारी गेला, तर त्यात सातत्य असते, पण हे ओएसडी आहेत, ज्यांच्या नेमणुका मंत्र्यांसोबत असतात, असे फरेरा म्हणाले. अ‍ॅड. फरेरा यांनी पर्यटन मंत्र्यांना पोंबुर्पा झरीला नवी उभारी देण्याच्या आश्वासनाबद्दल देखील प्रश्न विचारला.
पण पोंबुर्पा झरीवर कोणतेही काम करण्यात विभागाला यश आलेले नाही, ही अत्यंत खेदाची आणि लाजिरवाणी बाब आहे. झरीचे काम कसे करण्याचे नियोजन आहे याची ठराविक कालमर्यादा हवी आहे,’ असे सांगून फरेरा म्हणाले की, ती जीर्ण अवस्थेत आहे, टाइल्स फुटल्या आहेत, शौचालये कार्यरत नाहीत, शौचालयात पाण्याची सोय नाही, कपडे बदलण्याच्या खोलीची दैना झाली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar